मराठी बातम्या /बातम्या /देश /

शिवसेनेपाठोपाठ भाजपचं आणखी एक ब्रेक अप, गमावला हा जुना मित्र

शिवसेनेपाठोपाठ भाजपचं आणखी एक ब्रेक अप, गमावला हा जुना मित्र

भाजप आणि शिवसेनेचं ब्रेक अप झाल्यानंतर एनडीएतल्या काही मित्रपक्षांनी भाजपबद्दल आवाज उठवला होता. आता भाजपचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलाने दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला साथ द्यायची नाही, असं ठरवलंय.

  • Published by:  Arti Kulkarni
दिल्ली, 20 जानेवारी : भाजप आणि शिवसेनेचं ब्रेक अप झाल्यानंतर एनडीएतल्या काही मित्रपक्षांनी भाजपबद्दल आवाज उठवला होता. आता भाजपचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलाने दिल्लीच्या निवडणुकीत भाजपला साथ द्यायची नाही, असं ठरवलंय. दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारीला निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजप आणि अकाली दल यांच्यातले मतभेद समोर आले.केंद्र सरकारने NRC म्हणजेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची अमलबजावणी करू नये, असं शिरोमणी अकाली दलाचं म्हणणं आहे. आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याचं स्वागत करतो पण या कायद्यातून एखाद्या धर्माच्या लोकांना वगळलं जावं, अशी मागणी आम्ही कधीच केली नव्हती, असं शिरोमणी अकाली दलाचे नेचे मजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितलं. CAA मध्ये सगळ्या धर्माच्या लोकांचा समावेश व्हावा, असंही ते म्हणाले. भूमिका न बदलण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाला आम्ही आमची भूमिका बदलावी, असं वाटत होतं. पण आम्ही भूमिका बदलण्याच्या ऐवजी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला हेही त्यांनी सांगितलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयू यांची युती आहे. नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष 2 जागांवर लढणार आहे.

(हेही वाचा : उत्कृष्ट स्विमर, मोदी-शहांचे विश्वासू, कोण आहेत भाजपचे नवे अध्यक्ष जे.पी नड्डा?)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी उंचावण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. पण या सगळ्या घडामोडींमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातली फूट सगळ्यांच्या समोर आली आहे. ===============================================================================
First published:

Tags: Amit Shah, BJP

पुढील बातम्या