VIDEO मसूदवरच्या बंदीनंतरही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहणार?

VIDEO मसूदवरच्या बंदीनंतरही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहणार?

'देशात आणि जागतिक पातळीवर एक मजबूत नेता म्हणून आपली प्रतिमा उंचावण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. पण ते राहुल गांधी यांना जमलं नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 02 मे : जैश ऐ मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहरवरच्या बंदीनंतर भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं. त्यानंतर पाकिस्ताननेही त्याच्यावर बंदी घातली. मात्र या बंदीनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाबद्दलच्या भूमिकेत काही बदल होईल का असा प्रश्न विचारण्यात येतोय. या बंदीनंतर पाकिस्तानवरचा दबाव वाढला असला तरी त्यांच्या दहशतवादाबद्दलच्या भूमिकेत फारसा फरक पडणार नाही असा दावा परराष्ट्रमंत्रालयातले माजी सचिव विवेक काजू यांनी केलाय. सीएनबीसी आवाज च्या चुनावी अड्डा कार्यक्रमात ते बोलत होते.

विविके काटजू यांनी पाकिस्तानमधल्या भारतीय दुतावासातही अनेक वर्ष काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या मताला विशेष महत्त्व आहे. काटजू म्हणाले, मसूदवरची बंदी हे भारताचं यश असलं तरी त्याने हुरळून जाण्याचे कारण नाही. करण हाफीज सईदवर बंदी घातली तरी तो आज उजळमाथ्याने पाकिस्तानात फिरत आहे. तसच मसूद अजहरच्या बाबतीतही होण्याची शक्यता आहे.

पूर्वी भारताची बाजू ठामपणे ऐकून घेतली जात नव्हती. आज मात्र सर्व जग भारताची बाजू गांभीर्याने ऐकून घेत आहे हे भारताचं मोठं यश आहे. पाकिस्तानावरचा हा दबाव जास्तित जास्त कसा वाढवता येईल याची भारताने काळजी घ्यावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

तर नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्टीचं मार्केटींग करण्यात तरबेज आहेत. त्यामुळे त्यांनी याही बंदीचं मार्केटींग केलं असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर या बंदीचा फायदा भाजपला मिळेल का? यावर चर्चा करण्यापेक्षा या बंदीमुळे दहशतवादाला आळा बसेल का यावर चर्चा करायला पाहिजे असं मत ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी व्यक्त केलं.

या प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न होणारच आहे. नरेंद्र मोदी देशात आणि जागतिक पातळीवर एक मजबूत नेता म्हणून आपली प्रतिमा उंचावण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र एक मजबूत नेता म्हणून आपली प्रतिमा उंचावण्यात राहुल गांधी यांना यश आलं नाही असं मत ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी व्यक्त केलं.

पण देशात लोकसभेच्या निवडणुका असल्याने या विषयावर चर्चा झाली नसती तरच नवल. हा निर्णय मोदी सरकारचा विजय असल्याचा दावा आता भाजपकडून करण्यात येत आहे. भारताचे पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरचे हवाई हल्ले, त्यानंतरचं राजकारण, विंग कमांडर अभिनंदन याची सुटका यामुळे राजकारण तापलं आहे. त्यातच आता मसूदवर बंदी घातल्याने राजकारण तापणार असलं तरी या बंदीचा मोठा भारताला होणार आहे.

First published: May 2, 2019, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading