तुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू

तुरुंगात गुटखा, खैनीसाठी उपोषण; आंदोलन करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू

जिल्हा कारागृहात कैद्यांनी चांगले जेवण, पान-मसाला आणि खैनी यासाठी उपोषण सुरु केले.

  • Share this:

जौनपूर, 17 जुलै: आंदोलन करणे किंवा एखाद्या मागणीसाठी उपोषणाला बसणे ही गोष्ट नवी नाही. तुम्ही याआधी ही अशा प्रकारच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. पण पान-मसाला, गुटखा, खैनी या गोष्टींसाठी कोणी उपोषणाला बसले आहे असे सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये उपोषणाचा एक नवा प्रकार समोर आला आहे. जो आजपर्यंत कधीच ऐकला नसेल. जौनपूर येथील जिल्हा कारागृहात कैद्यांनी चांगले जेवण, पान-मसाला आणि खैनी यासाठी उपोषण सुरु केले. कैद्यांचे हे आंदोलन इतक्या टोकाला गेले की उपोषण करणाऱ्या एका कैद्याचा मृत्यू झाला. आता तुरुंगातील अन्य कैद्यांनी या मृत्यूला उपोषण आणि पोलिसांकडून झालेली मारहाण जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर तुरुंग प्रशासनाने कैद्याचा आजारामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

जौनपूर जिल्हा तुरुंगात 7 जुलै रोजी टाकण्यात आलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात बीडी, सिगारेट, पान-मसाला, गांजा यासह अन्य अंमली पदार्थ सापडले होते. डीएम अरविंद मलप्पा आणि एसपी विपिन कुमार यांनी हा छापा टाकला होता. या छाप्यानंतर तुरुंग प्रशासनाने या सर्व गोष्टींवर बंदी घातली. या बंदीवर कैद्यांनी उपोषणाला सुरुवात केली. कैद्यांच्या मते तुरुंगात चांगले जेवण मिळत नाही आणि अन्य सुविधा देखील खराब आहेत. विशेष म्हणजे या मागण्यासंदर्भात कैद्यांचे म्हणणे कोर्टासमोर मांडण्यात आले आहे.

तुरुंगातील कैद्यांनी उपोषण सुरु केल्यामुळे संपूर्ण वातावण तणावाचे झाले होते. कैद्यांनी तुरुंगात घोषणाबाजीही सुरु केली होती. अखेर डीआयडीना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी बंदी मागे घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कैद्यांनी उपोषण मागे घेतले होते. पण मंगळवारी सकाळी जयराम नावाच्या कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला.

मारहाण केल्यामुळे झाला मृत्यू

उपोषण करणारा कैदी जयराम याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाचा दावा अन्य कैद्यांनी केला आहे. तुरुंगातील उपअधिक्षकांनी त्याला मारहाम केली आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित कैद्याची प्रकृती खराब होती आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथेच त्याचा मृत्यू झाल्याचे तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई-अमेरिका विमान प्रवास स्वस्त होणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 17, 2019, 9:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading