नरेंद्र मोदींसाठी धोक्याची घंटा, ...तर गमवावं लागणार बहुमत?

नरेंद्र मोदींसाठी धोक्याची घंटा, ...तर गमवावं लागणार बहुमत?

लोकसभेच्या जागा कमी झाल्या तर भाजपला त्याची भरपाई करावी लागणार असून अमित शहांपुढं ते मोठं आव्हान ठरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,12 डिसेंबर : पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार येणार असल्याने देशाचं राजकीय चित्रच बदलणार आहे आणि राजकीय नकाशाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या हिंदी पट्ट्यात भाजपला प्रचंड बहुमत मिळालं होतं. पण आता तीन महत्त्वाची राज्य हातातून गेल्याने त्या लोकसभा जागांची भरपाई भाजप कसं करणार हा प्रश्न आता विचारला जातोय.

जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ आणि गुजरात या हिंदी पट्ट्यात लोकसभेच्या  273 जागा आहेत. सध्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे यातल्या तब्बल 226 जागा आहेत.

या निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र आली तर भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला पूर्वी सारख्या जागा मिळतीलच याची खात्री नाही. अशीच परिस्थिती राहिली तर भाजपच्या लोकसभेसाठी 80 ते 100 जागा कमी होण्याची शक्यता आहे. असं झालं तर भाजपला त्याची भरपाई करावी लागणार असून अमित शहांपुढं ते मोठं आव्हान ठरणार आहे.

नुकत्याच निवडणुक झालेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 65 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत यातल्या तब्बल 60 जागा भाजपने आपल्या झोळीत टाकल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला नाकारलं तर लोकसभेत काय होणार याची धास्ती भाजपने घेतलीय. 2014 मध्ये राजस्थानच्या एकूण 25 जागांपैकी भाजपने तब्बल 24, मध्यप्रदेशात 29 पैकी 26 तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यातल्या भाजपच्या अर्ध्या म्हणजे 30 जागा जरी कमी झाल्या तरी ती भरपाई कुठून करायची याचं गणित भाजपचे अध्यक्ष अमित शहांना

तीन राज्यांमधली लोकसभा 2014ची स्थिती

मध्यप्रदेश 2014

एकूण जागा 29

भाजप 26

काँग्रेस 03

राजस्थान 2014

एकूण जागा 25

भाजप 24

काँग्रेस 01

छत्तीसगड 2014

एकूण जागा 11

भाजप 10

काँग्रेस 01

ईशाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात सगळ्या अंबानी कुटुंबीयांनी केला परफॉरमन्स

First published: December 12, 2018, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading