छेडछाड करीत होता काँग्रेस नेता; भररस्त्यात तरुणींनी चपलेने केली धुलाई, VIDEO झाला VIRAL

छेडछाड करीत होता काँग्रेस नेता; भररस्त्यात तरुणींनी चपलेने केली धुलाई, VIDEO झाला VIRAL

मारहाणीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • Share this:

जालोन, 1 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील जालोन (Jaluan) जिल्ह्यातील उरईमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांना दोन तरुणींनी स्टेशन रोडवर मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणींनी नेत्यावर फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला आहे. यावर अनुज मिश्रा यांचं म्हणणं आहे की, त्यांचं बिल्डिंग मटेरिअलचे दुकान आहे. तरुणींच्या घरात या दुकानातून तब्बल दीड ते दोन लाखांचं सामान गेलं होतं. त्यांच्याकडून अनेकदा याचे पैसे मागण्यात येत होते. त्यानंतर तरुणींनी अनुज यांना मारहाण केली.

अनुजने पोलीस ठाण्यात तरुणींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर मुख्यमंत्री योगींचे मीडिया सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी ट्विट करीत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे.

हे प्रकरण जालोनमधील उरई भागात दोन तरुणींनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनुज मिश्रा यांना भररस्त्यात मारहाण केली. इतकच नाही तर त्या तरुणींनी चपलेने त्यांना मारहाण केली. तरुणीने काँग्रेस जिल्हाध्यक्षावर फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. पीडित तरुणींनी सांगितले की, काँग्रेस जिल्हाध्यक्ष त्यांना फोन करून अश्लीलपणे बोलतात आणि शिव्याही देतात. याची तक्रार त्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अजय सिंह उर्फ लल्लू यांच्याकडे केली होती. मात्र जिल्हाध्यक्षांवर कोणतीही कारवाई झाली नाही. उलटपक्षी ते म्हणाले की, पोलीस आमच्या खिशात आहे. तुम्ही आपचं काही बिघडवू शकत नाही. पीडितेंनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तक्रार केल्यानंतरही कोणती कारवाई झाली नाही तेव्हा त्यांनीच जिल्हाध्यक्षला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 1, 2020, 9:00 PM IST

ताज्या बातम्या