पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; भारतानं एअर स्ट्राईकनंतर पाडले 3 ड्रोन

भारतानं पाकिस्तानचं आणखी एक ड्रोन पाडलं असून आत्तापर्यंत भारतानं पाकचे 3 ड्रोन पाडले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 03:54 PM IST

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; भारतानं एअर स्ट्राईकनंतर पाडले 3 ड्रोन

बीकानेर, 9 मार्च : भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. आज देखील भारतानं हेरगिरी करणारं पाकिस्तानचं ड्रोन पाडलं असून त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. दरम्यान, हे ड्रोन कुठं पडलं? याचा आता शोध घेतला जात आहे. राजस्थानमधील श्रीगंगासागर हिंदूमलकोट सीमारेषेजवळ सकाळी हे ड्रोन पाडलं गेलं आहे. भारतात हेरगिरी करण्यासाठी हे ड्रोन वापरलं गेलं होतं. यावर भारतीय वायु दलानं ही कारवाई केली आहे. पण, वायु दलानं याबद्दल अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. गोळ्यांचे आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती.

सटे कोनी आणि खातलाबना या गावांजवळ ड्रोन पडलं असावा असा अंदाज आहे. दरम्यान, गावकऱ्यांना याबद्दल काही माहिती मिळाल्यास कळवावी. तसेच संशयास्पद वस्तुला हात लावू नये असं आवाहन लष्करानं केलं आहे. यापूर्वी देखील भारतानं पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत.


हवाई दलाच्या पॅराट्रूपरचा विचित्र अपघातात मृत्यू; 11000 फुटांवरून मारली उडी, पण....


Loading...

बाहवलपूरजवळ जवळ पाडलं ड्रोन

4 मार्च रोजी देखील पाकिस्तानकडून भारतीय वायु क्षेत्रामध्ये घुसखोरी करण्यात आली. त्यावेळी 4 मार्च रोजी सकाळी 11:30च्या सुमारास राजस्थान सीमेजवळ एक अज्ञात विमान उडताना दिसलं. याची माहिती मिळताच भारतीय वायुदलाकडून हे विमान पाडण्यात आलं.

भारतीय वायुदलाच्या सुखोई लढाऊ विमानातून मिसाईल सोडून त्याला खाली पाडण्यात आलं. ड्रोन सारखं दिसणारं हे मानवरहित विमान पाकिस्तानच्या फोर्ट अब्बास परिसरात कोसळलं. जे बाहवलपूरजवळ आहे. या कोसळल्या विमानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ट्विटवर ट्वीट करण्यात आले होते.


गुजरात सीमेजवळ देखील पाकची हेरगिरी

26 फेब्रुवारीला देखील एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारतात हेरगिरीचा प्रयत्न केला. पण, गुजरातमधल्या पाकिस्तान जवळच्या कच्छ सीमेवर भारताने पाकिस्तानचं ड्रोन पाडलं.


उंदराने चोरले कोट्यवधींचे हिरे, CCTV VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 03:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...