News18 Lokmat

लोकसभा 2019: अडवाणींपाठोपाठ मुरली मनोहर जोशींचा पत्ता कट!

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कट केला.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 10:24 AM IST

लोकसभा 2019: अडवाणींपाठोपाठ मुरली मनोहर जोशींचा पत्ता कट!

नवी दिल्ली, 26 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कट केला होता. अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून अध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवणार आहेत. अडवाणींच्या पाठोपाठ आता पक्षातील आणखी एका ज्येष्ठ नेत्याला निवडणूक लढवऊ नका, असे सांगण्यात आले आहे.

न्यूज 18शी बोलताना भाजपमधील ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले की, मी यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. पक्ष नेतृत्वाने तसे आदेश दिल्याचे जोशी यांनी सांगितले. जोशी यांनी कानपूरच्या मतदारांसाठी एक संदेश लिहला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मला कानपूरमधून उमेदवारी दिली जाणार नाही. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल यांनी ही माहिती दिल्याचे जोशी यांनी संदेशात म्हटले आहे.

गेल्या काही दिवासांपासून कानपूरमधून त्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु होती. यावेळी देखील तेच पक्षाचे उमेदवारी असतील असे वाटत होते. कारण कानपूरमधून अन्य कोणी दावेदारी केली नव्हती. तसेच काहीच दिवसांपूर्वी जोशी कानपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या सर्व घडामोडी पाहता जोशीच पुन्हा कानपूरमधून लढतील असे वाटत होते. प्रत्यक्षात आता भाजपनेच त्यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जोशींच्या ऐवजी कानपूरमधून कोण निवडणूक लढवणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीत जोशींनी प्रथमच कानपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसने श्रीप्रकाश जयसवाल यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा जोशी यांनी जयसवाल यांचा 2 लाख 23 हजार मतांनी पराभव केला होता. यंदा देखील काँग्रेसने जयसवाल यांनाच उमेदवारी दिली आहे, पण यावेळी त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी जोशी नसतील.त्याआधी जोशी यांनी नरेंद्र मोदींसाठी वाराणसी हा मतदारसंघ सोडला होता.


Loading...

लिंबू सरबत पिण्याआधी 'हा' VIDEO एकदा पाहाच


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2019 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...