कोरोनाने सगळंच हिरावलं; लग्नाच्या तब्बल 9 वर्षांनी झाला बाळाचा जन्म, पण 15 दिवसांत आई-वडिलांचा मृत्यू

कोरोनाने सगळंच हिरावलं; लग्नाच्या तब्बल 9 वर्षांनी झाला बाळाचा जन्म, पण 15 दिवसांत आई-वडिलांचा मृत्यू

डोड्डेनहल्ली गावातील एका महिलेने लग्नानंतर नऊ वर्षांनी एका चिमुकलीला 11 मे रोजी जन्म दिला, पण त्या चिमुकलीच्या जन्माआधी आणि जन्मानंतरही मोठं संकट कोसळलं.

  • Share this:

म्हैसूर, 16 मे : कोरोनाचा देशभरात कहर (Coronavirus) सुरू असून अनेकांनी या काळात आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. अनेक चिमुकल्यांनी आपल्या आई-वडिलांचं छत्र गमावलं आहे. अशीच अतिशय हृदयद्रावक घटना कर्नाटकातील म्हैसूरमधून समोर आली आहे. डोड्डेनहल्ली गावातील एका महिलेने लग्नानंतर नऊ वर्षांनी एका चिमुकलीला 11 मे रोजी जन्म दिला, पण त्या चिमुकलीच्या जन्माआधी आणि जन्मानंतरही मोठं संकट कोसळलं.

ममता आणि नंजुंडे गौडा यांच्या घरी नऊ वर्षांची गोड बातमी समजल्याने हे जोडपं मोठं आनंदात होतं. या आनंदाच्या काळात कोरोनाचं संकट येऊ नये, म्हणून योग्य ती काळजी घेण्यात येत होती. पण कोरोनाने या कुटुंबाला गाठलंच आणि बाळाच्या जन्माआधीच मोठं संकट कोसळलं. 45 वर्षीय नंजुंडे गौडा यांचा बाळाच्या जन्माआधीच 30 एप्रिलला मृत्यू झाला. बंगळुरूमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

(वाचा - आता 84 दिवसांनंतरच मिळणार Covishield चा दुसरा डोस, CoWIN पोर्टलमध्येही होणार बदल)

त्यानंतर 11 मे रोजी बाळाचा जन्म झाला आणि केवळ चार दिवसांत बाळाच्या आईचा, ममता यांचा मृत्यू झाला. ममता यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचदरम्यान त्यांनी बाळाला जन्मही दिला. काही दिवसांत त्यांची तब्येत खालावली आणि 15 मे रोजी कोरोनाने त्यांनाही हिरावलं.

(वाचा - कोरोनामुळं 32 दिवसात कुटुंब संपलं; पती अन् प्राध्यापक पत्नीसह मुलाचाही मृत्यू)

नऊ वर्षांपूर्वी नंजुंडे आणि ममता यांचं लग्न झालं होतं. मात्र त्यांनं बाळ झालं नव्हतं. आता नऊ वर्षांनी घरात आनंदांची बातमी आली होती. मात्र काळाने त्यांचा सगळाच आनंद हिरावून घेतला. आता ममता यांच्या भावंडांनी त्या चिमुकलीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: May 16, 2021, 9:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या