कोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत

कोरोना महासाथीत तब्बल 6 महिन्यांनंतर पुन्हा झाल्या शाळांच्या इमारती जिवंत

तब्बल 5 महिन्यांपासून कोरोनाच्या महासाथीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, आजपासून अनेक शाळांबाहेर मुलांचा वावर दिसत आहे

  • Share this:

 दिल्ली, 21 सप्टेंबर : संपूर्ण देशात पसरलेल्या कोरोना व्हायरस महासाथीदरम्यान (Coronavirus Pandemic) आज 21 सप्टेंबर रोजी शाळा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा कहर सुरूच असल्याने काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी झालेली असली तरी काही राज्यात अद्यापही शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. तर काही राज्यात अटींसह शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश सरकार ने 21 सप्टेंबरपासून शाळा अंशीक स्वरुपात सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र शाळेत यायचं की ऑनलाइन क्लासेसना उपस्थिती लावणे हे विद्यार्थ्यांवर व त्यांच्या पालकांवर सोडण्यात आले आहे. म्हणजे 9 वी पासून ते 12 वी पर्यंत विद्यार्थी एकतर शाळेत जाऊ शकतात व ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. सरकारने जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, शाळांना सोमवारपासून पुन्हा उघडण्यात येईल.

आसाम

आसाममध्येदेखील शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जारी करण्यात आले आहे.  में भी स्कूलों को एसओपीअंतर्गत क्लासेस एकदिवसाआड चालविण्यात येईल. 9वी आणि 12 वीचे वर्ग सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी चालतील. तर 10 वी आणि 11 वीचे वर्ग गुरुवार, मंगळवार आणि शनिवारी चालतील.

हे ही वाचा-देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक, 24 तासांत 94 हजार जणांना डिस्चार्ज

बिहार

बिहारमध्ये शाळा उघडण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मात्र 80 ते 85 टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी इच्छुक नाहीत.

उत्तर प्रदेश

दुसरीकडे उत्तर प्रदेशात शाळा 30 सप्टेंबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णासंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली

दिल्लीत 5 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येतील. जर माध्यमिक विभागाला आवश्यकता असल्यास मार्गदर्शनासाठी विद्यार्थी शाळेत येऊ शकतात.

गोवा

गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही 2 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याता निर्णय घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वाटल्यानंतरही शाळा सुरू करण्यात येतील.

पंजाब

पंजाबमध्ये कंटेन्मेंट झोनबाहेर शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थी शाळेत येऊ शकतात.

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार 9 वी त्यापुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत बोलावता येऊ शकतं. मात्र राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही सांगितले जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 21, 2020, 9:59 AM IST

ताज्या बातम्या