• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम वेगानं, 168 भारतीय काबूलहून हिंडनमध्ये दाखल

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम वेगानं, 168 भारतीय काबूलहून हिंडनमध्ये दाखल

Afghanistan Crisis: दुसरे विमान ताजिकिस्तानची राजधानी दुसांबे येथून दिल्लीला आले.

  • Share this:
    काबूल, 22 ऑगस्ट: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अडकलेल्या भारतीयांना (Indians) पुन्हा मायदेशी आणण्यासाठी वेगानं प्रयत्न सुरु आहे. आज सकाळी हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान काबूलहून 107 भारतीयांसह एकूण 168 प्रवाशांना घेऊन राजधानी दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचले. तत्पूर्वी रविवारी सकाळी 87 भारतीयांना घेऊन दोन विमाने दिल्लीला पोहोचली. यातील एक विमान कतारमधील दोहा येथे पोहोचले, तर दुसरे विमान ताजिकिस्तानची राजधानी दुसांबे येथून दिल्लीला आले. रविवारी सकाळी अफगाणिस्तानाहून 500 भारतीय वेगवेगळ्या जागांवरुन आणि उड्डाणानं आपल्या मायदेशी परतलेत. प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात भारत देशाकडूनही प्रयत्न सुरु आहेत. भारत सातत्यानं हवाई दलाच्या विमानांनी भारतीय नागरिकांना परत आणत आहे. दरम्यान, भारत सरकारने (Indian Government) आता अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित वापसी (Evacuate) साठी दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी दिली आहे. अफगाणिस्तानच्या सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 87 भारतीय सकाळी दिल्लीत अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या 87 भारतीयांना( Indians) घेऊन विमान मायदेशी परतलं आहे. रविवारी सकाळी हे विमान दिल्लीत (Delhi) पोहोचलं. यातलं एक विमान कतारच्या दोहा, तर दुसरं ताजिकिस्तानची राजधानी दुसांबेहून येथे पोहोचलं. अफगाणिस्तातून घरवापसी करत असलेले भारतीयांनी (Indians in Afghanistan) जोरात भारत माताचे नारे दिले. अफगाणिस्तानच्या महिला पत्रकाराचा जीव धोक्यात; मदतीसाठी भारताकडे धाव, म्हणाली...   परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. यासह, त्यांनी हे देखील सांगितले की, नेपाळचे दोन नागरिक देखील विमानात उपस्थित आहेत. मंत्रालयाने सांगितले की, इतर भारतीयांनाही मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज रात्रीपर्यंत इतर 300 भारतीयांना सुखरूप त्यांच्या मायदेशी परत आणले जाईल.
    Published by:Pooja Vichare
    First published: