अलर्ट! काश्मीर अस्थिर करण्यासाठी पाकचा मोठा प्लॅन; घेत आहे या दहशतवाद्यांची मदत

काश्मीर प्रकरणी सर्व बाजूंनी प्रयत्न केल्यानंतर यश न मिळाल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जुन्याच मार्गाने भारताची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 06:38 PM IST

अलर्ट! काश्मीर अस्थिर करण्यासाठी पाकचा मोठा प्लॅन; घेत आहे या दहशतवाद्यांची मदत

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: मोदी सरकारने जम्मू-काश्मीर(Jammu Kashmir)ला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सैराभैरा झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान(Pakistan Army)ला भारताला झुकवायचे आहे. यासाठी कलम 370चा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न झाला. पण तेथेही पाकिस्तान एकटेच पडले. काश्मीर प्रकरणी सर्व बाजूंनी प्रयत्न केल्यानंतर यश न मिळाल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जुन्याच मार्गाने भारताची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान लष्कराने काश्मीरमध्ये अफगाण (Afghan) आणि पश्तून दहशतवाद्यांच्या मदतीने दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याच्या प्रयत्नात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाण आणि पश्तून दहशतवादी बॅट अॅक्शन (BAT) यांच्या मार्फत पाकिस्तान लष्कर प्रत्यक्ष ताबा रेषेवरून कारवाई करू शकतील. सध्या हे दहशतवादी POKमध्ये लीपा व्हॅलीत आहेत. एनएसजी (SSGकमांडो सोबत हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व जण वेग वेगळ्या लॉन्च पॅचवर असल्याचे समजते. ज्या लीपा व्हॅलीत दहशतवादी लपले आहेत. हा भाग तंगधार आणि उरीच्या दुसऱ्या बाजूला POKमध्ये आहे. पाकिस्तानी लष्कर उरी, गुरेज, केरन, केजी नौशेरा सेक्टर या भागातून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहेत.

कलम 370 हटवल्यापासून दहशतवादी कारवायांना चाप बसू शकतो याची जाणीव झाल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत बिघडवण्याचा पाकचा प्रयत्नव आहे. यामुळेच भारतीय लष्कर देखील अलर्टवर आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तान सातत्याने सीमेवर गोळीबार करत आहे. पाककडून झालेल्या या गोळीबारात आतापर्यंत दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने देखील पाकच्या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईत अनेक पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत.

काहीच दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात पाकिस्तान लष्करातील सुबेदार अहमद खान हा ठार झाला होता. अहमद खान यानेच अभिनंदन यांना ताब्यात घेतले होते आणि नंतर चौकशी दरम्यान त्यांना मारहाण देखील केली होती. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना माघारी पाठवताना अभिनंदन यांचे विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. पाकिस्तानच्या जवानांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला भारताने दिलेल्या उत्तरा दरम्यान POKमधील नकियाल सेक्टरमध्ये 17 ऑगस्ट रोजी सुबेदार अहमद खान ठार झाला. खान हा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला होता.

Loading...

परीक्षेचा तणाव? 10 वीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 06:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...