अफगाण महिला युद्धात लढतात मग भारतीय का नाही?

अफगाण महिला युद्धात लढतात मग भारतीय का नाही?

अफगाण महिला लढाईत भाग घेतात मग भारतीय महिला का युद्धात भाग घेत नाही हा प्रश्न अफगाण अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

  • Share this:

12 डिसेंबर: अफगाण लष्करातल्या 20 महिला अधिकारी सध्या प्रशिक्षणासाठी भारतात आल्या आहेत. अफगाण महिला लढाईत भाग घेतात मग भारतीय महिला  का युद्धात भाग घेत नाही हा प्रश्न अफगाण अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

भारत आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या करारनुसार भारतीय सैन्य अफगाणी सैन्यातील जवानांना  आणि अधिकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. त्यानुसार  20 महिला अधिकाऱ्यांचं  चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग सुरू आहे. 4 डिसेंबरपासून त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे.

20 दिवसांचा हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. विशेष म्हणजे अफगाण लष्करात महिलांना प्रत्यक्ष लढाईतही उतरवलं जातं.  पण भारतात अजून तसं नाही आहे. भारतात महिला अजूनही सहाय्यकाच्या भूमीकेत असतात.  अफगाण महिलांना एके 47 चा वापर  रायफल्सचा वापर शिकवला जातोय.

त्यांना शिकवणाऱ्या भारतीय महिला अधिकाऱ्यांनीही युद्धात लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतात एक महिला पंतप्रधान झाली तरी अजून  मैदानी युद्धात महिला लढत नाही आहेत. त्यामुळे आता अफगा महिलांचा आदर्श घेऊन तरी महिलांना भारतात युद्धात लढता येईल  का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 10:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading