'आएगा तो ट्रम्प ही' मोदींप्रमाणेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठीही नारा

'आएगा तो ट्रम्प ही'  मोदींप्रमाणेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठीही नारा

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी 'आएगा तो मोदी ही' चा नारा घेऊन मोहीम चालवण्यात आली होती. हा नारा खरा ठरला आणि नरेंद्र मोदीच पुन्हा निवडून आले. आता असाच नारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यासाठीही देण्यात आला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 6 जून : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी 'आएगा तो मोदी ही' चा नारा घेऊन मोहीम चालवण्यात आली होती. हा नारा खरा ठरला आणि नरेंद्र मोदीच पुन्हा निवडून आले. आता असाच नारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्यासाठीही देण्यात आला आहे.

अमेरिकेमध्ये 2020 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. यामध्ये पुन्हा एकदा डॉनल्ड ट्रम्प हेच निवडून येतील, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. याबद्दल सीएनएन आणि एसएसआरएस या अमेरिकेमधल्या एका प्रसिद्ध संस्थेने एक सर्व्हे केला. या सर्व्हेचाही हाच निष्कर्ष आहे.

ट्रम्प यांनाच पसंती

या सर्व्हेमध्ये, डॉनल्ड ट्रम्प हेच निवडून येतील असं मत 54 टक्के मतदारांनी नोंदवलं. 41 टक्के लोकांनी ट्रम्प निवडून येणार नाहीत,असा कौल दिला.

बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या पहिल्या टर्मच्या शेवटी असाच एक सर्व्हे करण्यात आला होता. तेव्हा त्यांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांची पसंती मिळाली नव्हती. पण यावेळी मात्र अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्या नावाला पसंती दिली आहे.

लोकप्रियता वाढली

अमेरिकेमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता वाढली आहे, हेच हा सर्व्हे दर्शवतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्व्हे केला गेला तेव्हा ट्रम्प यांना 51 टक्के लोकांनी पसंती दिली होती. आता हा आकडा 54 टक्क्यांवर गेला आहे.

ज्या लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतं दिली त्यांनी, डॉनल्ड ट्रम्प हे खोटं बोलतात, ते वंशवादी आहेत, राष्ट्राध्यक्षपदाला ते लायक नाहीत, अशी मतं व्यक्त केली.

रोजगाराच्या मुद्द्यावर पसंती

ज्या लोकांनी ट्रम्प यांच्या बाजूने मतं दिली त्यांच्या मते, डॉनल्ड ट्रम्प यांनी रोजगारांवर भर दिला. त्यासोबतच अमेरिकेची अर्थव्यवस्थाही त्यांनी रुळावर आणली, असं 26 टक्के लोकांचं मत आहे. तर, ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण केली, असं 12 टक्के लोकांचं मत आहे.

=======================================================================================================

VIDEO : उद्धव ठाकरेंनी मानले अदृश्य हातांचे आभार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading