Home /News /national /

बंडोबांवर कारवाई होणार? राज्यात पोलिसांना हाय अलर्ट, सावध व्हा! कोरोना बळावतोय TOP बातम्या

बंडोबांवर कारवाई होणार? राज्यात पोलिसांना हाय अलर्ट, सावध व्हा! कोरोना बळावतोय TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 24 जून : राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडामुळे सरकार अस्थिर होत असल्याची चिन्ह दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून उपाध्यक्ष हटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सुत्र हातात घेतल्याचे दिसत आहेत. तर शरद पवार देखील मैदानात उतरले आहेत. दरम्यान, या राजकीय गोंधळात एक वाईट बातमी अशी आहे, की राज्यात कोरोना वेगाने पसरू लागला आहे. राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. बंडखोर आमदारांवर कारवाई होणार? महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अखेर अपात्र ठरवण्याबाबत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यातील सर्व पोलीस स्टेशन हाय अलर्टवर विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात सुरू झालेलं वादळ अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट सध्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. भावुक होत गुवाहाटीतून सेना आमदारानं मांडली घुसमट मुख्यंत्र्यांनी आपल्या भावना कधीही समजून घेतल्या नाहीत, असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी जाहीर पत्रातून केला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या मुंबईतील आमदार यामिनी जाधव (Yamini Jadahav) यांनी थेट गुवाहाटीमधून  व्हिडीओतून प्रसिद्ध करत आपली घुसमट व्यक्त केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरच होणार कारवाई? 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली. पण, आता अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेचे अधिकारच नाहीत, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यासंदर्भात दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. एकनाथ शिंदे गटाला झटका; गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासाठी आता एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. अजय चौधरी यांची गटनेते पदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांनाच मान्यता दिली गेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे. तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राजकीय घडामोडी, पावसाळ्याच्या तोंडावर कोरोना बळावतोय; निष्काळजीपण येईल अंगलट राज्यात कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. गेल्या 24 तासात भारतात नवीन 17 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले (corona update Maharashtra) आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड! केरळ राज्यातील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वायनाड येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली (MP Rahul Gandhi's office in Wayanad vandalised) आहे. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्विटमध्ये आरोप केला आहे की "राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांनी SFI चे झेंडे हातात धरले होते". दरम्यान, SFI कडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Rahul gandhi

    पुढील बातम्या