काश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या

काश्मीर मुद्द्यावर ठोसपणे बाजू मांडणाऱ्या वकिलाची गोळी घालून हत्या

काही दिवसांपूर्वी बाबर कादरी यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये काश्मीर मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं.

  • Share this:

श्रीनगर, 24 सप्टेंबर: जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) श्रीनगरमध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नामांकीत वकील बाबर कादरी (Advocate Baber Qadri) यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर बाबर कादरी यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

काही दिवसांपूर्वी बाबर कादरी यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये काश्मीर मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यावरून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा...शूटिंग लोकेशन पाहून घरी जाणाऱ्या आर्ट डायरेक्टरला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हावल परिसरात सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांला अज्ञात दहशतवाद्यांनी बाबर कादरी यांच्यावर हल्ला केला. बाबर कादरी यांच्यावर दहशतवाद्यांनी जवळून गोळी झाडून ते पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत बाबर कादरी यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी परिसर सील केला आहे. त्याचप्रमाणे नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

ट्वीट केला होता एक स्क्रीनशॉट...

वकील बाबर कादरी यांनी तीन दिवसांपूर्वी एक ‘स्क्रीनशॉट’ ट्वीट केला होता. आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील बाबर कादरी यांनी आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. संस्थांसाठी मोहीम राबवतो, अशा माझ्याविरोधात अफवा पसरवणाऱ्या शाह नजीरविरोधात एफआयआर दाखल करा, अशी विनंती त्यांनी जम्मू पोलिस प्रशासनाला केली होती. खोट्या वक्तव्यांमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं बाबर कादरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

टीव्ही डिबेटमध्ये सहभाग

वकील बाबर कादरी हे कायम टीव्ही डिबेटमध्ये सहभाग घेत असत. तसेच स्थानिक वृत्तपत्रातून त्यांचे विविध विषयांवरील लेख प्रसिद्ध होत असतं. त्यामुळे फुटीरतावादी त्यांच्यावर कायम टीका करत होते.

हेही वाचा...व्हॉट्सअ‌ॅप चॅट कारवाईसाठी सक्षम पुरावा होऊ शकत नाही, उज्ज्वल निकम यांचा खुलासा

दरम्यान, बडगाममध्ये बुधवारी रात्री भाजपच्या सरपंचाची हत्या करण्यात आली. ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलरचे (BDC) अध्यक्ष आणि भाजपचे सरपंच भूपिंदर सिंग यांची दलवाश गावात राहत्या घरी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading