लालकृष्ण अडवाणी यांच्या ब्लॉगवर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रीया

लालकृष्ण अडवाणी यांच्या ब्लॉगवर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रीया

'अडवाणीजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन मिळत असल्याचा आपल्याला अभिमान आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली, 4 एप्रिल : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज ब्लॉग लिहून राष्ट्रवाद आणि इतर विषयांवर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावरून माध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. या ब्लॉगवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. अडवाणी यांनी व्यक्त केलेल्या भावना या भाजपच्याच भावना आहेत असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय.

मोदी म्हणाले, देश पहिले, नंतर पक्ष आणि त्यानंतर व्यक्ती हे भाजपचं तत्वज्ञान आहे. तोच भाव लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मांडला आहे. हेच भाजपचं मार्गदर्शक तत्व आहे. भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आणि अडवाणीजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन मिळत असल्याचा आपल्याला अभिमान आहे असंही मत मोदींनी व्यक्त केलंय.काय म्हणाले अडवाणी

लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.  'सर्वप्रथम देश, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वत्व' ही माझ्या आयुष्याची मार्गदर्शक तत्त्व आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अडवाणींनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, '6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीला आपला वर्धापन दिवस साजरा करणार आहे.  स्वतःच्या आतमध्ये डोकावण्याची भाजपमधील सर्वांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे'.

शिवाय, त्यांनी राष्ट्रवादाचा मुद्दादेखील मांडला आहे. याबाबत परखड मत व्यक्त करत त्यांनी म्हटलं आहे की, 'राजकीय विरोध दर्शवणारे देशद्रोही ठरू शकत नाही. भारतीय लोकशाही ही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करते. ज्यांनी आमच्या विचारांशी सहमती दर्शवली नाही, त्यांना भाजपनं कधीही आपला राजकीय शत्रू मानले नाही. तर केवळ त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहिलं आहे. पक्षानं प्रत्येक नागरिकाला आपला प्रत्येक विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मग तो विचार वैयक्तिक पातळीवरील असो किंवा राजकीय व्यासपीठावरील असो.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 11:47 PM IST

ताज्या बातम्या