13 वर्षांत 16 पटीने वाढली राहुल गांधींची संपत्ती, एडीआरच्या अहवालातून माहिती उघड

13 वर्षांत 16 पटीने वाढली राहुल गांधींची संपत्ती, एडीआरच्या अहवालातून माहिती उघड

धक्कादायक! उत्तर प्रदेशात 38 टक्के आमदार खासदार आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

  • Share this:

लखनऊ, 02 मार्च : खासदार आणि आमदारांच्या संपत्तीबाबतचा अहवाल गुरुवारी असोशिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्मस (एडीआर)ने प्रसिद्ध केला. उत्तर प्रदेशात सगल तीनवेळा खासदार, आमदार झालेल्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.  2004 ते 2017 या कालावधीतील उत्तर प्रदेशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशीतील आमदार आणि खासदारांच्या संपत्ती आणि इतर गोष्टींची माहिती देण्यात आली आहेत.

एडीआरच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील आमदार आणि खासदारांपैकी 38 टक्के नेते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात 23 टक्के नेत्यांवर खून, दंगल, खूनाचा प्रयत्न, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे. तर पुन्हा पुन्हा निवडून येणाऱ्या खासदार, आमदारांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

2004 ते 2017 या कालावधीत निवडणूक लढणारे उमेदवार, आमदार आणि खासदार यांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करून एडीआरने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार गेल्या 13 वर्षात लोकसभा-विधानसभा निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टीने सर्वाधिक 59 टक्के कोट्यधीशांना उमेदवार म्हणून उभा केलं. त्याखालोखाल समाजवादी पक्ष 55 टक्के, भाजप 52 टक्के तेर काँग्रेसने 42 टक्के उमेदवार कोट्यधीश होते. जिंकणाऱ्या खासदार आणि आमदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक 73 टक्के खासदार,आमदारांचा समावेश आहे.

235 खासदारांच्या शपथपत्रावरून समजलं की प्रत्येक खासदारांची सरासरी संपत्ती 6 कोटी इतकी आहे. सलग तीनवेळा खासदार झालेल्यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली आहे. यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची संपत्ती 55 लाखांवरून जवळपास 10 कोटी म्हणजेज 16 पट वाढली आहेत. तर सपा नेते मुलायमसिंग यादव यांच्या संपत्तीत 13 पट आणि माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संपत्तीतही 10 पट वाढ झाली आहे.  भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्याही संपत्तीत 5 पट वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 08:55 AM IST

ताज्या बातम्या