Home /News /national /

कौतुकास्पद! एका हृदयाचा दुसऱ्यासाठी अवघ्या 2 तासांत 260 किमी प्रवास

कौतुकास्पद! एका हृदयाचा दुसऱ्यासाठी अवघ्या 2 तासांत 260 किमी प्रवास

काही लोक असे असतात की ज्यांचं ह्रदय मृत्यूनंतरही धडधडत राहतं. अशा लोकांच्या जीवनाचा एक मंत्रा असतो..तो असा की,

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर :  देशभरात मोठ्या प्रमाणात अवयवदानाची चळवळ राबवली जात आहे. यातून आतापर्यंत अनेकांना नवजीवन मिळालं आहे. अशीच काहीशी कथा राजस्थानमधील (Rajsthan) एका तरुणाची आहे. त्याच्यामुळे दिल्लीतील (Delhi) एका रुग्णालयात भरती असलेल्या व ह्रदयाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तीला जीवनदान मिळालं आहे. मुलासाठी केलं अवयवदान 16 वर्षांचा एक बालक रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. जयपुरच्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलावर उपचार सुरू असताना त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा ब्रेन डेड असल्याची माहिती मिळाली. हे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र स्वत:ला सांभाळत आई-वडिलांनी मुलाचं ह्रदय दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे दुसऱ्याला जीवनदान मिळावं अशी त्यांची इच्छा होती. चार तासांत ऑपरेशन झालं पूर्ण सूचना मिळताच दिल्लीतील साकेतस्थित मॅक्स रुग्णालयातील टीम (Max Hospital) चार्टर्ड प्लेन घेऊन जयपूरला पोहोचले आणि चार तासात दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात हार्ट ट्रांसप्लांटेशनची प्रक्रिया पूर्ण केली. हे सर्व जलद होण्यासाठी दिल्ली एअरपोर्ट ते मॅक्स रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आलं. ज्यामुळे अवघ्या 18 मिनिटांत ट्रान्सप्लांट करण्यात येणाऱ्या ह्रदयाला दिल्ली एअरपोर्टपासून मॅक्स रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. हे ही वाचा-वाघाला बघून प्राण्यांची उडाली घाबरगुंडी; VIDEO पाहून खो-खो हसाल रस्ते अपघातात झाला होता जखमी 16 वर्षांचा मुलगा रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. जयपूर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जयपूरमधून तो ब्रेन डेड असल्याची व अवयवदान करण्याची सूचना मिळाली. त्यानंतर मॅक्स रुग्णालयाची टीम चार्टर विमानाने जयपूरला पोहोचली. ही टीम तेथून ह्रदय घेऊन चार्टर विमानाने बुधवारी रात्री दिल्ली आयजीआय एअरपोर्टवर पोहोचली. एअरपोर्टपासून दिल्ली पोलिसांनी मॅक्स रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडोन तयार करण्यात आले. ज्यामुळे रुग्णवाहिकेने 18 मिनिटांत एअरपोर्टपासून ह्रदय घेऊन रुग्णालयात पोहोचले. अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार तासात ह्रदय प्रत्यारोपण होणे गरजेचे आहे. ठरलेल्या वेळेत प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 45 वर्षांच्या रुग्णाचा झालं ह्रदयप्रत्यारोपण दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाच्या मेरठच्या एका 45 वर्षीय व्यक्तीचं ह्रदय प्रत्यारोपण करण्यात आलं. त्यांचं ह्रदय अवघे 15 ते 20 टक्के काम करीत होतं. याकारणाने त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. सोबतच त्यांच्या पायाला सूज आली होती. गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार करणारी मेडिकल टीम ह्रदयाच्या प्रतीक्षेत होती. आता एका   के मैक्स अस्पताल में मेरठ के जिस 45 साल के मरीज को हार्ट ट्रांसप्लांट किया गया उनका दिल महज 15-20 फीसदी ही काम कर पा रहा था. इस वजह से वो  वर्षांच्या मुलाचं अवयवदान केल्याने त्यांना नवीन जीवन मिळालं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या