भारताचा प्रवास 'मेक इन इंडिया' पासून 'रेप इन इंडिया'पर्यंत, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

भारताचा प्रवास 'मेक इन इंडिया' पासून 'रेप इन इंडिया'पर्यंत, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

देशात महिलांची सुरक्षाच धोक्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक विषयांवर बोलत असतात. लहान सहान विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात. मात्र महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर त्यांनी अजुनही प्रतिक्रीया दिली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 10 डिसेंबर : लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे कायम आपल्या वक्तव्यांनी वादात सापडतात. इंग्रजी आणि बंगालीवर प्रभुत्व असलेल्या चौधरींचं हिंदी फारसं चांगलं नाही त्यामुळे भाषण करतांना आणि टीका करताना ते असं काही वक्तव्य करतात की त्यामुळे वाद निर्माण होते. अशा वादांमुळे अनेकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलाय. तर चौधरींनाही काही वेळा दिलगीरी व्यक्त करावी लागली. चौधरी हे फायर ब्राँड नेते म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांचा हा आक्रमकपणा त्यांच्याच अंगलट येत असल्याचं दिसतंय. आताचा वाद झालाय तो महिला सुरक्षेच्या मुद्यावरून. देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लोकसभेत झालेल्या चर्चेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केला आणि जी टीका केली त्यावरून आता हा ओढवला आहे.

नवं सरकार नवा वाद! बाळासाहेब ठाकरे की अटलबिहारी वाजपेयी?

चौधरी म्हणाले, देशात महिलांची सुरक्षाच धोक्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक विषयांवर बोलत असतात. लहान सहान विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात. मात्र महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर त्यांनी अजुनही प्रतिक्रीया दिली नाही. त्यांच्या या मौनाचा अर्थ काय आहे असा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. पंतप्रधानांनी या विषयावर संसदेत सविस्तर बोललं पाहिजे.

सध्या पोलिसांचा धाक उरलेला नसून त्यामुळे गुन्हेगारांचं मनोबल वाढलं आहे. मोदींनी अनेक मोठ मोठ्या घोषणा केल्या मात्र त्यांचं पुढे काय झालं ते काहीच कळत नाही? मेक इन इंडिया पासून सुरू झालेला भारताचा प्रवास हा रेप इन इंडियापर्यंत गेला आहे. त्यावरून लोकसभेत वाद निर्माण झाला. भाजपच्या सदस्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. आपण काय बोलतोय याचं भान तरी चौधरींना आहे काय असा सवाल सदस्यांनी विचारला.

PM मोदींची डोकेदुखी वाढवण्यासाठी पवारांचा प्लॅन तयार, फक्त आहे 'हा' एक अडथळा

देशात बेटी बचाओ ही मोहिम राबवली जात असताना अनेक सीता जाळल्या जात आहेत असं वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत केलं होतं. त्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी चांगल्या भडकल्या होत्या. नंतर काँग्रेसचे काही सदस्य हे अंगावर धावून गेले असा आरोपही त्यांनी केला होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या