मोदी आणि शहा म्हणजे रामू-श्यामूची जोडी, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वादाची ठिणगी

मोदी आणि शहा म्हणजे रामू-श्यामूची जोडी, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वादाची ठिणगी

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे लोकांची दिशाभूल करण्याचे मास्टर्स आहेत. त्यांच्यावर विश्वास नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 25 डिसेंबर : काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी (Adhir  Ranjan Chaudhari) हे आपल्या वक्तव्यांनी कायम वादात सापडतात. कधी पंतप्रधान मोदींवर दिलेल्या वक्तव्यांवरून तर कधी भाजपच्या महिला नेत्यांवर केलेल्या टीकेवरून. आपलं हिंदी तेवढं चांगलं नसल्यामुळे त्याचा गैरअर्थ काढला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. यावेळीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी वक्तव्य करून वादाची ठिणगी पाडलीय. NRC देशात लागू करण्याचा कुठलाही विचार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी दिल्लीतल्या भाषणात स्पष्ट केलं होतं. त्यावरून चौधरी यांनी शहा आणि मोदीवर शेलक्या भाषेत टीका केलीय. चौधरी म्हणाले, NRCबद्दल कुठलीच चर्चा नाही असं मोदी म्हणाले. पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवणार. कारण मोदी आणि शहा म्हणजे रामू-श्यामूची जोडी आहे. ते दोघही लोकांची दिशाभूल करण्याचे मास्टर असल्याने त्यांच्यावर विश्वास नाही अशी टीका त्यांनी केली होती. या आधी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्बला असं म्हटलं होतं. त्यावरूनही वाद झाला होता.

मोदी आणि शहा हेच खरे घुसखोर असून ते गुजरातमधून दिल्लीत आले आहेत. पहिले त्यांनाच त्यांच्या राज्यात परत पाठवलं पाहिजे अशी टीका त्यांनी केली. चौधरी यांच्या या टीकेवर भाजपचा भडका उडाला असून चौधरी यांच्यावर भाजपने पलटवार केला होता.

या आधीही झाला होता वाद

इंग्रजी आणि बंगालीवर प्रभुत्व असलेल्या चौधरींचं हिंदी फारसं चांगलं नाही त्यामुळे भाषण करतांना आणि टीका करताना ते असं काही वक्तव्य करतात की त्यामुळे वाद निर्माण होते. अशा वादांमुळे अनेकदा काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलाय. तर चौधरींनाही काही वेळा दिलगीरी व्यक्त करावी लागली. चौधरी हे फायर ब्राँड नेते म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांचा हा आक्रमकपणा त्यांच्याच अंगलट येत असल्याचं दिसतंय. आताचा वाद झालाय तो महिला सुरक्षेच्या मुद्यावरून.  देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लोकसभेत झालेल्या चर्चेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केला आणि जी टीका केली त्यावरून आता हा ओढवला आहे.

नवं सरकार नवा वाद! बाळासाहेब ठाकरे की अटलबिहारी वाजपेयी?

चौधरी म्हणाले, देशात महिलांची सुरक्षाच धोक्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक विषयांवर बोलत असतात. लहान सहान विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात. मात्र महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर त्यांनी अजुनही प्रतिक्रीया दिली नाही. त्यांच्या या मौनाचा अर्थ काय आहे असा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. पंतप्रधानांनी या विषयावर संसदेत सविस्तर बोललं पाहिजे.

सध्या पोलिसांचा धाक उरलेला नसून त्यामुळे गुन्हेगारांचं मनोबल वाढलं आहे. मोदींनी अनेक मोठ मोठ्या घोषणा केल्या मात्र त्यांचं पुढे काय झालं ते काहीच कळत नाही? मेक इन इंडिया पासून सुरू झालेला भारताचा प्रवास हा रेप इन इंडियापर्यंत गेला आहे. त्यावरून लोकसभेत वाद निर्माण झाला. भाजपच्या सदस्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. आपण काय बोलतोय याचं भान तरी चौधरींना आहे काय असा सवाल सदस्यांनी विचारला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 25, 2019, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading