या गोष्टींसाठी आता आधार कार्डाची सक्ती नाही

या गोष्टींसाठी आता आधार कार्डाची सक्ती नाही

बँकेमध्ये खातं उघडताना किंवा नव्या मोबाइल कनेक्शनसाठी आधार कार्ड जोडणं आता सक्तीचं असणार नाही. आधार कार्डचा वापर ऐच्छिक असावा या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जुलै : बँकेमध्ये खातं उघडताना किंवा नव्या मोबाइल कनेक्शनसाठी आधार कार्ड जोडणं आता सक्तीचं असणार नाही. आधार कार्डचा वापर ऐच्छिक असावा या विधेयकाला संसदेने मंजुरी दिली आहे.

राज्यसभेमध्ये आधार कार्डबद्दलचं हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झालं आहे. आधार कार्डांच्या डेटाचा गैरवापर झाल्यास 1 कोटी रुपयांचा दंड आणि तुरुंगवास ठोठावण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला याआधीच लोकसभेची मंजुरी मिळाली आहे. 4 जुलैला लोकसभेने या विधेयकाला मंजुरी दिली होती.

आधार आणि त्याविषयक कायदे विधेयक 24 जूनला लोकसभेमध्ये मांडण्यात आलं होतं.

आधार कार्ड हरवलं तर काय?

आधार कार्ड हा आपल्या आयुष्यतला महत्त्वाचा दस्तावेज आहे. पण हेच आधार कार्ड हरवलं तर? चिंता करू नका. UIDAI नं एक नवी सेवा सुरू केलीय. यात तुम्ही किरकोळ पैसे देऊन आधार कार्ड री प्रिंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला www.uidai.gov.in वर जायला हवं. तुम्ही तुमच्या पहिल्या आधार कार्डाच्या नंबरासह परत मिळवू शकता. ज्या व्यक्तींचा मोबाइल नंबर आधार कार्डाबरोबर लिंक नाही, ते अर्ज करू शकतात.

रोहित लगावणार आणखी 2 शतक आणि भारत जिंकणार वर्ल्ड कप, विराटनं केली भविष्यवाणी

याआधी आधार कार्ड हरवलं तर री प्रिंट करता यायचं नाही. त्यासाठी तुम्हाला UIDA च्या वेबसाइटवर जाऊन ई वर्जन डाउनलोड करावी लागायची आणि ते तुमचं आयडेंटिटी प्रूफ व्हायचं.

UIDAI च्या वेबसाइटप्रमाणे कुणीही 50 रुपये भरून आधार कार्ड री प्रिंट करू शकतात. हे कार्ड पोस्टानं तुमच्या घरी येतं. आधार कार्ड परत री प्रिंट करण्यासाठी तुम्ही आधार नंबर किंवा व्हर्चुअल नंबरचा उपयोग करू शकता.

आधार री प्रिंट करण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड हवा. कारण वन टाइम पासवर्ड मोबाइलवर पाठवला जातो. तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसला तरीही तुम्ही अर्ज करू शकता.

=================================================================================

SPECIAL REPORT : राणेंवर का आली 'दादा माझ्या मुलाला वाचवा' म्हणण्याची वेळ!

First published: July 8, 2019, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading