लॉकडाऊनमध्ये 'दुधवाला' आला मदतीला धावून, आजाराने तळमळणाऱ्या आजींपर्यंत पोहोचवलं औषध

लॉकडाऊनमध्ये 'दुधवाला' आला मदतीला धावून, आजाराने तळमळणाऱ्या आजींपर्यंत पोहोचवलं औषध

लॉकडाऊनमध्ये अनेकजण एकमेकांना सहकार्य करत कोरोनाशी लढा देत आहेत. 'दुधवाला' असणाऱ्या राहुलची एक कहाणी सुद्धा संजय पटेल या Ad Professional असणाऱ्या गृहस्थाने फेसबुकवर शेअर केली आहे.

  • Share this:

इंदौर, 02 एप्रिल : भारतामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याच गोष्टींसाठी बाहेर पडता येणार नाही. सगण्यात मोठी चिंता एकटे राहणाऱ्या वयस्कर माणसांची आहे. त्यांना घराबाहेर पडणं शक्य नसेल, तर औषधपाण्याचं कोण बघणार असा प्रश्न निर्णाण होतो. मात्र अनेकदा अगदी नात्यातील नसणारी माणसं सुद्धा मोलाची मदत करून जातात. सोशल मीडियावर अशा अनेक कहाण्या आपण गेल्या अनेक दिवसांपासून वाचत आहोत. 'दुधवाला' असणाऱ्या राहुलची एक कहाणी सुद्धा संजय पटेल या Ad Professional असणाऱ्या गृहस्थाने फेसबुकवर शेअर केली आहे. इंदौर याठिकाणची ही घटना आहे. संजय पटेल यांनी राहुल जोशी या मुलाचे आभार मानले आहेत

(हे वाचा-पुणे, बुलडाण्यासाठी चिंतेची बातमी, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 338 वर)

पटेल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिल्यानुसार, राहुलचा दुग्धव्यवसाय असून अगदी त्याचा आजोबांच्या काळापासून तो पटेल यांच्या घरी दुध पोहोचवण्याचे काम करतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे गृहिणींची काम वाढली आहेत. असच काहीसं पटेल यांच्या पत्नीबरोबर झाले. त्यामुळे एका रात्री त्यांची प्रकृती काहीशी बिघडली होती. रात्रभर घरगुती उपचार केल्यानंतर पटेल यांच्या डोक्यात आलं की, आपण राहुलला व्हॉट्सअपवर मेसेज करून औषध आणण्यासंदर्भात सांगावं. 8-8.30 पर्यंत तो दूध घेऊन त्यांच्याकडे पोहोचायचा.पटेल यांनी विचार केला, 8 वाजता त्याला आठवण करण्यासाठी फोन करता येईल. पण सात वाजता राहुलचाच फोन आला की, 'काका मी गोळी घेऊन येतो'.

(हे वाचा-तुकाराम मुंढेंच्या आवाहनाला नागपूरकरांनी दुसऱ्या दिवशीही दाखवली केराची टोपली

त्यानंतर 9.30 वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता. उशीरा राहुल दूधही घेऊन आला आणि काकींचं औषध सुद्धा. तेव्हा पटेल यांना कळलं की, राहुलला त्यांच्या घराजवळ औषध न मिळाल्याने पुन्हा दुसऱ्या भागात जाऊन तो औषध घेऊन आला.

राहुलने केलेली मदत त्याच्या दृष्टीने जरी छोटी असली, तरी पटेल कुटुंबाला त्याचं फार कौतुक वाटलं. त्यांनी सोशल मीडियावर राहुलच्या फोटोसहित ही कहाणी शेअर केली आहे. सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सगळे कोरोनाशी लढत आहेत. अशा परिस्थितीत एकमेकांना मदत करणं गरजेचे आहे, तरच कोरोनाविरुद्धच्या लढाईल आपण नेटाने उभे राहू शकतो.

First published: April 2, 2020, 9:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading