उर्मिला मातोंडकर यांना दिल्लीतून बुलावा, उद्या करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

उर्मिला मातोंडकर यांना दिल्लीतून बुलावा, उद्या करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्य़ाचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : रंगीला चित्रपट फेम प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना बुधवारी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी काँग्रेसच्या मिलिंद देवरा, संजय निरुपम आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पक्षाकडून दिल्लीला बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे उद्या उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षात प्रवेस करतील अशीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर मुंबई उमेदवारीसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा पक्ष विचार करत असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्य़ाचं सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काॅग्रेस प्रवेश करून तिकीट देण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याच मतदार संघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या उमेदवारीसाठी आग्रही आहे अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजकारणातील वादग्रस्त अभिनेत्री करणार भाजप प्रवेश?

लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपने अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी दिली आहे. यातच अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जयाप्रदा यासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अभिनेत्री ते नेता असा प्रवास केलेल्या जया प्रदा यांनी जानेवारीमध्येच खासदार अमर सिंग आपले गॉडफादर असल्याचे म्हटले होते. तसेच जरी मी त्यांना राखी बांधली तरी लोक चर्चा करणे थांबवणार नाहीत असंही त्या म्हणाल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील रामपूर मतदार संघाच्या माजी खासदार असलेल्या जया प्रदा यांनी पक्षाने निलंबित केल्यानंतर अमर सिंग यांच्यासोबत राष्ट्रीय लोक मंच स्थापन केला होता. त्यांच्या आणि अमरसिंग यांच्या नात्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या होत्या.

समाजवादी पार्टीकडून 2004 आणि 2009 मध्ये खासदार झालेल्या जयाप्रदा यांनी भाजप प्रवेश केल्यास त्यांना रामपूर मतदारसंघाची उमेदवारी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे समाजवादी पार्टी आजम खान यांना त्यांच्याविरोधात तिकीट देऊ शकते. आजम खान आणि जयाप्रदा यांच्यातील वाद नवा नाही. 2009 मध्ये आजम खान यांच्या विरोधानंतरही जयाप्रदा यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. तर आतापर्यंत ११ पैकी 9 वेळा आजम खान रामपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार असल्याने आपल्या विरोधात कोणीही आलं तरी काही फरक पडणार नाही असं म्हटलं होतं. त्यांनी सपा-बसपा ला कमीत कमी 70 जागा मिळतील असा विश्वास असल्याचे सांगितले होते.

सपा आणि बसपा आघाडीमुळे भाजप हवालदिल झाले आहे. त्यामुळेच भाजपाकडून रामपुरमध्ये वातावरण बिघडवलं जाईल असा आरोपही आजम खान यांनी केला होता.

VIDEO: वहिनींशी पंगा घेऊ नका, तिच्याजवळ चार खासदार आहेत - सुप्रिया सुळे

First published: March 26, 2019, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading