Home /News /national /

आणखी एक अभिनेत्री काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर, अमित शहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?

आणखी एक अभिनेत्री काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर, अमित शहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?

आणखी एक अभिनेत्री काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमित शहांच्या उपस्थितीत लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली आहे.

    हैदराबाद, नोव्हेंबर23: काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयशांती (Congress Senior Leader & Actress Vijayshanti) लवकरच भाजप (BJP)मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जवळच्या लोकांकडून ही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना त्या उपस्थित राहत नव्हत्या. जर विजयशांती भाजपमध्ये सहभागी झाल्या तर त्या दक्षिण भारतामधून भाजपमध्ये सहभागी होणाऱ्या दुसऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ठरतील. या आधी अभिनेत्री खुशबू यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. विजयशांती यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचं स्थानिक बळ वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे हैदराबादेतील स्थानिक निवडणुकांमध्ये (Greater Hyderabad Municipal Corporation Election) चुरस वाढणार आहे. डिसेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत. विजयशांती यांनी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं ते भाजपच्याच साथीने. त्यानंतर त्या टीआरएस (TRS)मध्ये प्रवेश केला होता.  त्यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर  2014 साली विजयशांती यांनी काँग्रेसचा हात धरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्या नाराज होत्या. अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. विजयशांती यांच्यासोबतच अनेक नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबरमध्ये हैदराबादमधील स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि 4 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. ऐन निवडणुकीच्या हंगामामध्ये विजयशांती काँग्रेसला रामराम करणार असल्याने त्याचा काँग्रेसच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: BJP, Congress

    पुढील बातम्या