मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका

BREAKING सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (Sushant singh rajput death case)वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (Sushant singh rajput death case)वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (Sushant singh rajput death case)वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला.

  • Published by:  News18 Desk
फरीदाबाद, 21 डिसेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (Sushant singh rajput death case)वडील केके सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना हरियाणा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. सुशांतने मुंबईच्या त्याच्या घरात 14 जून रोजी आत्महत्या केल्यानंतर चित्रपटसृष्टी हादरली होती. या मृत्यूचा मोठा धक्का त्यांच्या परिवाराला बसला होता. सुशांतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी CBI, NIB सारख्या संस्थाही सामील झाल्या असून अजूनही या प्रकरणी चौकशी पूर्ण झालेली नाही. सुशांतचे वडील केके सिंह सुरुवातीला बिहारमध्ये राहायचे. पण सुशांतच्या मृत्यूनंतर ते फरीदाबादमध्ये राहात होते. सोशल मीडियावर सुशांतच्या वडिलांचं रुग्णालयातलं छायाचित्र शेअर झालं आहे. त्यानंतर ही बातमी बाहेर आली. या फोटोत सुशांतचे वडील हॉस्पिटलच्या बेडवर असल्याचे दिसत आहेत. मुलगा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते अजूनही उभे राहिले नसल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूड छायाचित्रकार विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सर्वप्रथम के.के. सिंह यांचा फोटो समोर आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना फरीदाबादच्या एशियन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मीतू यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही रुग्णालयात उपस्थित आहेत. सिंग यांची हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यावर सुशांतचे चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना करत आहेत. 14 जूनला केली आत्महत्या 14 जूनला सुशांत सिंहचा मृतदेह वांद्र्यातील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. यानंतर सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यावेळी या प्रकरणात ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. #JusticeForSSR, #SushantConspiracyExposed, #justiceforsushant, #sushantsinghrajput #SSR असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले होते. सोशल मीडियावरील बहुतेक अकाऊंट फेक होती, असा खुलासा मुंबई सायबर पोलिसांनी केला आहे.
First published:

Tags: Sushant Singh Rajput

पुढील बातम्या