रस्ते अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी नसीरुद्दीन शाह यांचा पुढाकार, तुम्ही कधी पुढे येणार?

रस्ते अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी नसीरुद्दीन शाह यांचा पुढाकार, तुम्ही कधी पुढे येणार?

अपघात झाल्यास पहिल्या ६० मिनिटांत कोणती पावले उचलावीत याबाबत नागरिकांना माहिती दिली तर हे चित्र बदलता येऊ शकतं. यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक नसीरुद्दीन शाह यांनी पुढाकार घेतला आहे आणि आपला आवाज देऊ केला आहे.

  • Share this:

जग झपाट्यानं बदलत चाललं आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती होत आहे. पण दुसरीकडे, माणूस त्याची नैतिक मूल्यं आणि माणुसकी त्याच वेगाने विसरत चालला आहे. रस्त्यावर एखादा अपघात घडतो तेव्हा आपली जी प्रतिक्रिया असते, त्यातून आपली असंवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते.

अशा परिस्थितीत बहुतेक जण बघ्याची भूमिका घेतात. त्यांना काळजी वाटण्यापेक्षा प्रसंगाविषयी उत्सुकताच अधिक असते. त्याहूनही खालची पातळी म्हणजे काही जण तर मोबाईल काढून अपघाताच्या प्रसंगाचे चित्रीकरण करतात आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. रुग्णवाहिकेला पाचारण करण्यासाठी किंवा अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथमोपचार देण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही.

अपघात झाल्यास पहिल्या ६० मिनिटांत कोणती पावले उचलावीत याबाबत नागरिकांना माहिती दिली तर हे चित्र बदलता येऊ शकतं. यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक नसीरुद्दीन शाह यांनी पुढाकार घेतला आहे आणि आपला आवाज देऊ केला आहे. भारतात दर तासाला रस्ते अपघात १८ जण जखमी होतात. या परिस्थितीत नागरिकांनी अधिक सजगपणे वर्तन करावे आणि 'गोल्डन अवर' म्हणजेच पहिल्या ६० मिनिटात अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.

द गोल्डन अवर

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघात झाल्यानंतरच्या पहिल्या ६० मिनिटांमध्ये म्हणजेच 'गोल्डन अवर'मध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला योग्य वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अपघात झाल्यानंतरच्या पहिल्या काही मिनिटांत अपघातग्रस्त व्यक्तीला मदत मिळाली तर त्या व्यक्तीचा जीव वाचेलच, त्याचप्रमाणे जखमांमुळे निर्माण होणारी गुंतागुंत कमी होईल.

अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी लोक पुढे का येत नाहीत ?

• रुग्णवाहिका येईपर्यंत अपघातग्रस्त व्यक्तीला सुरक्षित कसे ठेवावे यासाठीची प्रक्रिया त्यांना माहीत नसते. तातडीच्या परिस्थितीत नक्की काय करावे हे त्यांना माहीत नसल्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीची शारीरिक स्थिती बदलावी किंवा शरीराला अधिक इजा न पोहोचवता त्या व्यक्तीला उचलावे का, हे निश्चित नसल्यामुळे त्या व्यक्तीला मदत करण्यास भीती वाटते.

• पोलीस केस आणि त्यानंतर हॉस्पिटल व पोलीस ठाण्यांमध्ये होणाऱ्या खेपांमध्ये अडकण्याची भीती असते.

• पोलिसांकडून होणारा जाच आणि वैयक्तिक वेळेचा अपव्यय व कामाचा खोळंबा होण्याचा त्रास. उलटपक्षी, अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करणाऱ्यास दिल्ली सरकारतर्फे रु. २००० रोख पारितोषिक आणि मानपत्र देण्यात येते.

• पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा आणि अहवाल सादर करणे आणि साक्षीदार असल्यास जबाब द्यावा लागणे.

• अपघात प्रकरणानंतर उद्भवणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेत गोवले जाणे.

रस्ते अपघात झाल्यानंतरच्या पहिल्या ६० मिनिटांमध्ये जीव कसा वाचवावा?

• रुग्णवाहिकेला पाचारण करण्यासाठी १०८ क्रमांक डायल करावा.

• अपघात शहराच्या सीमेमध्ये झाला असेल तर १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना अपघाताची माहिती द्यावी.

• १०३३ क्रमांकावर फोन करावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची १०३३ ही २४*७ टोल-फ्री हेल्पलाईन आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघात वा इतर कोणतीही आणिबाणीची परिस्थिती उद्भवल्यास या क्रमांकावरून मदत मिळते. या क्रमांकावर कॉल करून मदतीची प्रतीक्षा करा. https://ihmcl.com/24x7-national-highways-helpline-1033/

• अपघातग्रस्ताच्या मोबाईल फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याच्या कुटुंबियांची नावे शोधून त्यांना या घटनेची माहिती द्यावी. फोन लॉक असेल तरी फोनच्या होमस्क्रीनवर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर दिसू शकेल.

• अपघातग्रस्त व्यक्तीच्या आजुबाजूला जमलेल्या गर्दीला शांत करा आणि त्यांना थोडे मागे जाण्यास सांगा जेणेकरून अपघातग्रस्त व्यक्तीपर्यंत मोकळी हवा आणि ऑक्सिजन पोहोचू शकेल.

• तेथे उपस्थित असलेल्या काही जणांना वाहतुकीचे व्यवस्थापन करायला सांगा. गाड्यांना त्या ठिकाणी थांबू देऊ नका, अथवा रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होऊ शकेल.

• रस्त्यावरील उजव्या बाजूची मार्गिका रुग्णवाहिकेसाठी मोकळी ठेवा. सर्व वाहनांना न थांबता डाव्या बाजूच्या मार्गिकेने जायला सांगा.

• पीडिताने हेल्मेट घातलेले असेल तर डोक्याला धक्का न लावता हळुवारपणे हेल्मेटचा पट्टा काढा किंवा शक्य असल्यास हेल्मेट काढा.

• मानेभोवती, छातीभोवती आणि कंबरेभोवतीचे कपडे सैल करा. तुम्हाला प्रथमोपचारांची माहिती असेल तरच ते द्या. तुम्हाला त्याबद्दल माहिती नसल्यास पॅरामेडिक्स किंवा इतर वैद्यकीय मदत येण्याची प्रतीक्षा करा.

• अपघातग्रस्त व्यक्तीच्या शरीरातून रक्तस्त्राव होत असेल तर त्या जखमेला इतर कोणती वस्तू चिकटलेली आहे का, याचे निरीक्षण करा. ती वस्तू काढण्याचा प्रयत्न करू नका. तसे केल्यास रक्तवाहिनीला अधिक इजा पोहोचेल आणि अतिरिक्त रक्तस्त्राव होऊ शकेल.

• जखमेभोवती स्वच्छ कापड बांधून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न करा.

• हातातून किंवा पायातून रक्तस्त्राव होत असेल तर रक्तस्त्राव थांबविण्यासाठी हात किंवा पाय वरच्या दिशेला उचलून ठेवा.

• अपघातग्रस्त व्यक्तीच्या तोंडातून रक्त येत असेल किंवा रक्ताची उलटी होत असेल तर ती व्यक्ती गुदमरू नये यासाठी त्या व्यक्तीला कुशीवर वळवा

• जखमेच्या एका बाजूवर दाब द्या आणि जखमेचे तोंड बंद करण्यासाठी त्वचा जखमेच्या एका बाजूला खेचून जखम झाकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे रक्तस्त्राव थांबेल आणि अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे होणाऱ्या मृत्यूपासून त्या व्यक्तीचा जीव वाचेल.

• अपघातग्रस्त व्यक्ती गंभीररीत्या जखमी असेल आणि मदत येण्याची शक्यता नसेल किंवा विलंब होणार असेल तर त्या व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गोल्डन अवरमध्ये त्या व्यक्तीवर उपचार सुरू होतील आणि

योग्य प्रकारे त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

निष्कर्ष

भीती आणि उदासीनता या घटकांमुळे जबाबदार नागरिक होण्यापासून तुम्ही दोन पावले मागे सरकू नका. राष्ट्रपती कोविंद यांनी गुड समॅरिटन विधेयक २०१६ मध्ये पारित केलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने गुट समॅरिटन कायदा पास केलेला आहे. या कायद्यांतर्गत रस्ते अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या नागरिकांना कायदेशीर अडथळे आणि शोषणापासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.

तुमच्यातील माणुसकी आणि आतील नायकाला बाहेर येऊ द्या आणि अपघातग्रस्तांची मदत करून अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करा.

या उपक्रमाला नेटवर्क १८ आणि डिअॅजिओचे सहकार्य लाभले आहे. या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा आणि समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी योग्य आचरण करा.

https://drive.google.com/file/d/1wHLwyCAVFmA06AgLjY8nlx8JdMekoEeT/view?usp=sharing

==========================================================================================================

VIDEO: साखर झोपेत असलेल्या 4 मुलांना भरधाव कारनं चिरडलं

First published: June 26, 2019, 3:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading