नवीन वर्षाची दुख:द सुरूवात, ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन

नवीन वर्षाची दुख:द सुरूवात, ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन

कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता. 2015 मध्ये आलेला 'दिमाग का दही' हा कादर खान यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

  • Share this:

मुंबई, 1 जानेवारी : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. 81 वर्षीय कादर खान यांच्यावर कॅनडा इथं उपचार सुरू होते.

कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता. 2015 मध्ये आलेला 'दिमाग का दही' हा कादर खान यांचा अखेरचा सिनेमा ठरला. अनेक वर्ष ते कॅनडाला आपला मुलगा आणि सून यांच्या सोबत राहात होते.

कादर खान यांची अभिनय कारकीर्द

कादर खान यांनी 300 हून अधिक सिनेमांत काम केलं. आपला बुलंद आवाज आणि विनोदाचं टायमिंग यामुळे कादर खान यांचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले.

90 च्या शतकात गोविंदा आणि कादर खान अशी जोडी हिट होती. 'दूल्हे राजा', 'कुली न 1', 'राजा बाबू' आणि 'आँखे' असे सिनेमे एव्हरग्रीन ठरले. याशिवाय त्यांनी कुलीमध्ये अमिताभ बच्चनसोबतही काम केलं होतं. तर हिम्मतवाला सिनेमात जितेंद्रबरोबर महत्त्वाची भूमिका साकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading