उन्नाव, 28 जानेवारी : अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवालवर आलेल्या बॉलिवूड चित्रपट छपाकची चर्चा सुरु असतानाच उत्तर प्रदेशात अॅसिड हल्ल्याची घटना घडली आहे. एका तरुणीने तरुणावर अॅसिड हल्ला केला आहे. उन्नावमधील मौरावा इथं ही घटना घडली. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी अद्याप हा अॅसिड हल्ला असल्याचे म्हटलेलं नाही. तरुणीला ताब्यात घेतलं असून हे एकतर्फी प्रेमातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि पीडित तरुण गावात शेजारी शेजारी राहतात. मौरावा इथल्या गोनामऊ गावचे रहिवाशी आहेत. पीडीत तरुण दुध डेअरी चालवत होता. सोमवारी रात्री दोन वाजता टँकरमध्ये दूध भरून पाठवल्यानंतर डेअरीची स्वच्छता करत होता. त्यावेळी तरुणीने त्याच्यावर अॅसिड फेकल्यांच म्हटलं जात आहे.
Unnao: A girl allegedly threw acid on a boy,in Bhawani Ganj area y'day. ASP Unnao says "We've come to know that they had been in contact since several months&were neighbours. Boy was sent to hospital,girl is being questioned. Action will be taken as soon as we receive complaint" pic.twitter.com/sA35FNtfN4
— ANI UP (@ANINewsUP) January 28, 2020
पोलीस म्हणाले की, आम्हाला समजले की गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकमेकांना ओळखतात. ते शेजारी राहत होते. पीडित तरुणाला रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीची चौकशी सुरू आहे. अजुन तक्रार दाखल झालेली नसून ती मिळताच कारवाई करण्यात येईल.
वाचा : विवाहित प्रेयसीला जिवंत जाळलं, तिचा 5 वर्षांचा मुलगाही आगीच्या ज्वालात होरपळला
तरुणावर झालेल्या अॅसिड हल्ल्यात गळ्याला, कान, छाती आणि पाठीवरचा भाग जळाला आहे. त्याला लखनऊमधील खाजगी रुग्णालय पल्समध्ये दाखल केलं आहे. एकतर्फी प्रेमातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असून एकमेकांच्या संपर्कातही होते असा खुलासा पोलिसांनी केला आहे.
वाचा : आईची माया आटली, अडीच वर्षाच्या लेकराला पलंगात बंद करून प्रियकरासोबत पळाली आणि...