Breaking : PM नरेंद्र मोदींच्या पाटणा रॅलीत बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी गजाआड

Breaking : PM नरेंद्र मोदींच्या पाटणा रॅलीत बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी गजाआड

बोधगया आणि पाटणामध्ये 2013मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एका दहशतवाद्याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

पाटणा, 13 ऑक्टोबर : बोधगया आणि पाटणामध्ये 2013मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एका दहशतवाद्याला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला संशयित हा सिमी संघटनेचा दहशतवादी असून त्याचं नाव अजहरुद्दीन उर्फ केमिकल अली असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा आणि बोधगया बॉम्बस्फोटाप्रकरणी सुरक्षा यंत्रणा अजहरुद्दीनचा शोध घेत होत्या. सुरक्षा यंत्रणांच्या मोहिमेला यश आलं असून काही दिवसांपूर्वीच त्याला अटक करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

आतापर्यंत 17 जणांना अटक

पाटणा आणि बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत एकूण 17 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पण अजहरुद्दीन उर्फ केमिकल अली फरार होता. त्याला हैदराबाद विमानतळावरून छतीसगड पोलीस आणि एटीएसनं ताब्यात घेतलं. केमिकल अलीकडून पोलिसांनी पासपोर्ट, दोन वाहन चालक परवाना आणि मतदार ओळखपत्रदेखील जप्त केलं.

(वाचा :PM नरेंद्र मोदींच्या भाचीला भरदिवसा चोरट्यांनी लुटलं, बाईकस्वारांचा PHOTO VIRAL)

बौद्ध भिक्षुंना करण्यात आलं होतं टार्गेट

बिहामधील बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटात तिबेटीयन भिक्षु आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. हा हल्ला बौद्ध भिक्षुंना निशाण्यावर ठेऊन करण्यात आला होता. पाटणामध्ये ऑक्टोबर 2013 रोजी नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान स्फोट घडवण्यात आला होता. रॅलीदरम्यान झालेल्या स्फोटात अनेक निष्पापांचा बळी गेला होता. 2014मधील लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच हा भ्याड हल्ला झाला होता.

(वाचा :Jio ग्राहकांसाठी खूशखबर! अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी मिळणार एवढा फ्री टॉकटाइम)

हुंकार रॅलीदरम्यान झाला होता स्फोट

पाटणाच्या गांधी मैदानात 27 ऑक्टोबर 2013 रोजी नरेंद्र मोदी यांच्या 'हुंकार रॅली'चं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मोदींच्या रॅलीदरम्यानच पाटणामध्ये ठिकठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडल्यानं मोठी खळबळ उडाली होती.

(वाचा : अमानूष! महिलेला जिवंत जाळल्याचा VIDEO VIRAL, चार आरोपींना अटक)

मुंबईच्या चर्नीरोडमध्ये रहिवासी इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीचा भीषण LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 11:57 AM IST

ताज्या बातम्या