मराठी बातम्या /बातम्या /देश /Instagram वर महादेवांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप; भाजप नेत्याकडून तक्रार दाखल

Instagram वर महादेवांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप; भाजप नेत्याकडून तक्रार दाखल

जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी ही प्रतिमा तयारी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी ही प्रतिमा तयारी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी ही प्रतिमा तयारी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली, 9 जून : भगवान शिव यांच्या एक ग्राफिक्स फाईलबाबत (GIF) भारतीय जनता पक्षाचे नेते मनीष सिंह यांनी इन्स्टाग्राम (Instagram) विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या GIF फाईलमध्ये महादेवांची (Lord Shiva) चुकीची प्रतिमा दाखवली गेली असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी ही प्रतिमा तयारी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मनीष सिंह यांनी नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 'महादेवांच्या प्रतिमेचं चुकीचं वर्णन केलं आहे. लाखो-कोट्यवधी हिंदू महादेवांची पूजा करतात. एका GIF मध्ये महादेव यांच्या एका हातात वाईन आणि दुसऱ्या हातात मोबाईल फोन दाखवण्यात आला आहे', असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हिंदूंच्या भावना भडकवण्यासाठी आणि द्वेष वाढवण्याच्या उद्देशाने हे GIF तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे शांतता भंग होऊ शकते असंही ते म्हणाले. इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याविषयीही ते बोलले आहेत. त्याशिवाय अशाप्रकारे केलेला फोटो भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या कक्षेत येतं असल्याचंही ते म्हणाले.

(वाचा - Alert! पब्लिक WiFi चा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवाच)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनीष सिंह यांनी सांगितलं, की ते इन्स्टाग्राम स्टोरी अपलोड करत होते. त्यावेळी त्यांनी महादेवांबाबत सर्च केलं असता हे स्टिकर समोर आलं. हे स्टिकर कोणत्या युजरकडून तयार करण्यात आलेलं नाही, तर हे कंपनीने तयार केलं असल्याचं ते म्हणाले.

First published:

Tags: Instagram