NaMo Vs RaGa : 2019 मध्ये हे 8 नेते होऊ शकतात Accidental Prime Minister

2014ची लोकसभा निवडणूक जशी ऐतिहासिक झाली तशीच 2091 ची निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे. भाजपला बहूमत मिळालं नाही तर काय? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही हे स्पष्ट आहे आणि राजकारणात काहीही घडू शकतं हेही सत्य आहे. त्यामुळं अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा...

  • Share this:

शरद पवार : देशातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध. दांडगा अनुभव, विविध पक्षांना एकत्र ठेवण्याची हातोटी ही शरद पवारांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर विरोधीपक्षांमध्ये एकमत होऊ शकते. पण त्यांना काँग्रेस कितपत पाठिंबा देऊ शकेल याबद्दल शंका आहे. मात्र पर्याय म्हणून काँग्रेसही त्यासाठी राजी होऊ शकते. मात्र पवारांच्या विश्वसनियतेबद्दल कायम शंका व्यक्त केली जाते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे किमान 25 खासदार जर निवडून आले तरच त्यांची दावेदारी प्रबळ ठरू शकते.

मायावती : उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याने मायावतींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यात जातीय समिकरणं महत्त्वाची आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षांची मत त्यांना मिळाली तर बसपाला फायदा होऊ शकतो. 2014मध्ये बसपाचा सूपडा साफ झाला होता. 2019 मध्ये 30 खासदार निवडून आले तर मायवती आघाडी सरकारची स्थिती निर्माण झाली तर मायावतींचा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अखिलेश यादव : उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याने मायावतींप्रमाणेच अखिलेश यादव यांच्या आशाही पल्लीवीत झाल्या आहेत. एकेकाळी असलेली त्यांची पकड आता राज्यात राहिली नाही. मात्र बसपाची मतं त्यांना मिळाली तर फायदा होऊ शकतो. सपाचे 30-35 खसदार निवडून आले तर अखिलेश यादव यांचं नशीब उघडू शकते.

चंद्रशेखर राव : विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा करिष्मा दिसून आला. त्यांच्या झंझावतापुढे सर्वच राजकीय पक्ष मोडून गेले. लोकसभेतही त्यांची जादू कायम राहिली तर टीआरएसची दावेदारी प्रबळ होईल. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची केंद्रीय राजाकाणातली सक्रियता वाढली आहे.

ममता बॅनर्जी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अजुनही राज्यावर घट्ट पकड आहे. राज्यातल्या 42 लोकसभा जागांपैकी तृणमूलला 30 ते 35 जागांची अपेक्षा आहे. 30 जागा जरी ममतांना मिळाल्या तर त्यांना दिल्लीचा दरवाजा उघडला जाऊ शकतो. केंद्रात काम करण्याचा त्यांना अनुभव असल्याने आघाडीतल्या पक्षांना कसं एकत्र ठेवायचं याची त्यांना कल्पना आहे. मात्र आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावाला त्यांना आवर घालावा लागेल.

चंद्राबाबू नायडू : चंद्राबाबू नायडू यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेससोबत घरोबा केला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे. तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे. काँग्रेसलाही त्यांच्याबद्दल फार आक्षेप असणार नाहीत हे त्यांची जमेची बाजू आहे.

नवीन पटनायक :  आपलं राज्य भलं आणि आपलं राजकारण ही नवीन पटनायक यांची खासीयत. त्यामुळे ओरिसापलीकडे त्यांनी कधी आपली महत्त्वाकांक्षा ठेवली नाही. हीच त्यांची जमेची बाजू ठरू शकते. प्रादेशिक पक्षांच्या महत्त्वाकांक्षी नेत्यांच्या भांडणात कुणाच्या अधात-मधात नसलेले नवीन पटनायक यांना देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्याप्रमाणे लॉटरी लागू शकते.

नितीश कुमार : सध्या NDAमध्ये असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे कधीही पक्ष बदलू शकतात ही त्यांची खासीयत आहे. काँग्रेस आणि आघाडीला काही जागा कमी पडल्यास नितीश बाबूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चांगला फायदा मिळत असेल तर धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा पुढे करत ते NDA सोडण्यास कमी करणार नाहीत.

First published: January 17, 2019, 6:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading