PM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळची राजधानी तिरुवनंतपूरममधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोळी झाडल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 10:35 PM IST

PM मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी झाडली गेली गोळी!

तिरुवनंतपूरम, 18 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळची राजधानी तिरुवनंतपूरममधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत गोळी झाडल्याची घटना घडली आहे. शहरातील सेंट्रल स्टेडियममध्ये मोदींच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. तेव्हा अचानक झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदींच्या सभेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या एका राज्य पोलीस दलातील कर्मचाऱयाकडून अपघाताने गोळी झाडली गेली. मोदी सभेच्या ठिकाणी येण्याच्या काही मिनिट आधी झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेचे मुद्दा देखील उपस्थित केला जात आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदूकीतून गोळी झाडली गेली तो कोट्टयममधील एआर कॅम्पमधील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Loading...


या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. गोळी झाडली गेल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला दुसऱ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
VIDEO : नांदेडमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार मतदान; 'हे' आहे कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 10:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...