पर्यटकांनी भरलेल्या जीपनं उतारामध्ये अचानक बदला मार्ग, रस्त्यावरून थेट...; पाहा थरारक LIVE VIDEO

पर्यटकांनी भरलेल्या जीपनं उतारामध्ये अचानक बदला मार्ग, रस्त्यावरून थेट...; पाहा थरारक LIVE VIDEO

काही पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीपला अपघात झाला आहे. यात 6 लहान मुलं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

  • Share this:

दार्जिलिंग, 11 नोव्हेंबर : दार्जिलिंगमध्ये भीषण अपघात झाला आहे. काही पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीपला अपघात झाला आहे. उतारावरुन येणाऱ्या जीपने रस्ता सोडून अचानक आपला मार्ग बदलल्याने हा अपघात झाला. दार्जिलिंगमधील sandakphu रोड येथे झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे.

अपघात झालेल्या या जीपमध्ये उत्तरप्रदेशातील सर्व स्थानिक पर्यटक होते. यात 6 लहान मुलं जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मंगळवारी रात्री मुंबईतही भीषण अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडवली गावाजवळ हा अपघात झाला. रात्री 3.30 च्या सुमारास झालेल्या या विचित्र अपघातात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.

काच वाहतूक करणारा हा ट्रक होता. ट्रक चालकाकडून अचानक गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं, त्याचवेळी एका कंटेनरने ट्रकला मागून धडक दिल्याने जबरदस्त अपघात झाला.

Published by: Karishma Bhurke
First published: November 11, 2020, 12:41 PM IST

ताज्या बातम्या