06 मार्च : गुजरातमधील भावनगर इथं ट्रक पलटून झालेल्या भीषण अपघातात, तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत. हा ट्रक एका नाल्यात पडला. आज पहाटे भावनगर-राजकोट महामार्गावर ही दुर्घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट नाल्यात कोसळला. या भीषण दुर्घटनेत अनेकांनी जागीच प्राण गमावले.
ट्रकमध्ये जवळजवळ 60 जण होते आणि ते सगळे लग्नाचे वऱ्हाडी होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.