श्रीनगर, 13 डिसेंबर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या (Shrinagar) प्रसिद्ध डल तलावात एक अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. भाजपच्या मेगा रॅलीदरम्यान ही दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या मेगा रॅलीदरम्यान डल तलावातील शिकारी (Shikara) बोट पाण्यात बुडाली. यामुळे शिकारामध्ये बसलेले अनेक जण पाण्यात बुडाले. सुदैवाने यामध्ये सर्वांना वाचविण्यात यश आलं आहे. या रॅलीमध्ये अनेक शिकारा बोटींचा समावेश होता.
बीजेपीच्या मेगा रॅलीदरम्यान या शिकारा बोटीत जादा भार पडल्यामुळे बोट बुडाली. यावेळी शिकाऱ्यात अनेक पत्रकार, फोटोग्राफर उपस्थित होते. अचानक शिकार बुडाल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी लोकांना मदतीचा हात दिला. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
यावेळी news18 उर्दूचे कॅमेरामॅन फिरोज वानीही हजर होते. तेही सुखरुप बाहेर आले. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये शिकारा बोट बुडल्याचे दिसून येत आहे. मीडियामधील लोकांच्या हातात मोठ मोठ्या मशीन आहेत. शेजारील उभ्या असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी तातडीने मदतीचा हात दिल्याने मोठा अपघात टळला आहे. शिकार बोट बुडल्यानंतर एक महिला यामध्ये अडकली होती. यावेळी दोन बोटी आल्या व त्यांनी या महिलेला बाहेर काढले. सध्या श्रीनगरमध्ये कडाक्याची थंडी आहे. यामुळे महिलेला पाण्याबाहेर येण्यास कठीण जात होतं.