मोदी सरकारविरोधात प्राध्यापकाची FB पोस्ट, ABVP कार्यकर्त्यांनी दिली 'ही' शिक्षा

मोदी सरकारविरोधात प्राध्यापकाची FB पोस्ट, ABVP कार्यकर्त्यांनी दिली 'ही' शिक्षा

मोदी सरकारविरोधात FB पोस्ट लिहिणाऱ्या प्राध्यापकाला ABVPनं पोलिसांसमोर दिली शिक्षा

  • Share this:

बंगळुरू, 4 मार्च : मोदी सरकारविरोधात फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चक्क पोलिसांसमोरच शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर जाहिररित्या मोदी सरकारवर टीका केल्यानं  शिक्षा म्हणून ABVPच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाला गुघड्यांवर बसून माफी मागायला लावली. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमधील विजयपुरा येथील वचना पितामह डॉ. पी.जी. हलाकटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजीमधील हा प्रकार आहे.

प्राध्यापकानं फेसबुक पोस्टमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे कौतुक केले, असा आरोप करण्यात आला आहे. याची माहिती मिळताच ABVPच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने या प्राध्यापकाला गुडघ्यांवर बसायला सांगत माफी मागायला लावली.

या प्राध्यापकाचं नाव संदीप वाथर असे आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे कौतुक करत एअर स्ट्राईकवरुन मोदी सरकारवर टीका केली. संदीप वाथर यांची फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर ABVPच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि माफी मागायला लावली.

दरम्यान, कॉलेज प्रशासनाकडून प्राध्यापक वाथर यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Special Report : क्रूरकर्मा मसूद अझहरचा मृत्यू नेमका कशामुळे?

First published: March 4, 2019, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading