6 आठवड्यात आणखी एक करार, अबू धाबीच्या कंपनीनं Jio मध्ये गुंतवले 9,093.60 कोटी

6 आठवड्यात आणखी एक करार, अबू धाबीच्या कंपनीनं Jio मध्ये गुंतवले 9,093.60 कोटी

फेसबुक, KKR, General Atlantic नंतर आता अबू धाबीमधील एक कंपनीने जिओमध्ये भागीदारी घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जून: भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम आणि डिजिटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या jio मध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 6 आठवड्यांमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. फेसबुक, KKR, General Atlantic नंतर आता अबू धाबीमधील एक कंपनीने जिओमध्ये (jio) भागीदारी घेतली आहे.

अबू धाबीमधील स्वायत्त गुंतवणूकदार असलेली मुबाडाला कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीने 9,093.60 कोटी रुपये गुंतवल्याची घोषणा केली.मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनी ही अबू धाबीमधील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.

याआधी 22 मे रोजी अमेरिकेतील KKR कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक करून 2.23 टक्के भागीदारी घेतली. त्याआधी प्रायव्हेट इक्विटी कंपनी सिल्व्हर लेक (Silver Lake) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (Reliance Jio) मध्ये गुंतवणूक करणार आहे. या करारानुसार सिल्व्हर लेकने 75 कोटी डॉलर म्हणजेच 5,655.75 कोटींची गुंतवणूक जिओमध्ये करून 1.15 टक्के भागीदारी घेतली आहे. 27 एप्रिल रोजी फेसबुकनं रिलायन्स जिओ इंडस्ट्रीजमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती.

हे वाचा-JIOचा आणखी एक मोठा करार, General Atlantic करणार 6,598.38 कोटींची गुंतवणूक

हे वाचा-अमेरिकन कंपनी KKR कडून Jio मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 5, 2020, 8:53 AM IST
Tags:

ताज्या बातम्या