अंडरवेअरमुळे अमेरिकेला सापडला बगदादी, हेराने पुरवली होती माहिती

जगातील एक नंबरचा दहशतवादी अबू बक्र अल बगदादीला अमेरिकन लष्कराने ठार केल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2019 02:39 PM IST

अंडरवेअरमुळे अमेरिकेला सापडला बगदादी, हेराने पुरवली होती माहिती

वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर : अमेरिकन सुरक्षा दलाने इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल बगदादीचा खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याचं सांगितलं. अमेरिकन लष्कराने केलेल्या कारवाईत मारला गेलेला बगदादीच होता याची खात्री करण्यासाठी डीएनए टेस्ट कऱण्यात आली. यासाठी बगदादीच्या चोरलेल्या अंडरवेअरचा वापर केला गेला. एका हेराने बगदादीच्या अंडरवेअर चोरी केल्या होत्या. त्यानेच अमेरिकन सैन्याला बगदादीच्या ठावठिकाण्यांची माहिती दिली होती.

अमेरिकेच्या सैन्याला मदत करणाऱ्या हेराला कुर्दीश सशस्त्र बलाने निगरानीत ठेवलं होतं. त्यानेच इदलिबमधील बगदादीच्या संपूर्ण हालचाली आणि ठिकाणांची माहिती सुरक्षा दलांना पुरवली. सिरियाच्या उत्तर पश्चिम भागातील इदलिब प्रांतात बारिशा गावात बगदादीच्या तळांवर अमेरिकन लष्कराने हल्ला केला.

बगदादीला अमेरिकन सैन्यानं घेरल्यानंतर स्फोटकांनी स्वत:सह तीन मुलांनाही उडवलं. अमेरिकन लष्कराने केलेल्या हल्ल्याच्या आधी हेराने त्याच्याकडे असलेल्या बगदादीच्या अंडरवेअर दिल्या होत्या. त्याच्या आधारे डीएनए टेस्ट करून बगदादी तिथंच राहत असल्याचं लष्कराला समजलं. त्यानंतर लष्कराने कारवाई केली.

हेराने फक्त बगदादीच्या अंडरवेअरच दिल्या नाहीत तर रक्ताचे नमुनेदेखील दिले होते. या नमुन्यांची चाचणी करून हल्ल्यात ठार झालेला बगदादीच होता याची खात्री करण्यात आली. बगदादीला ठार करण्यासाठी मदत केल्याबद्दल कुर्दीश संघटनांचे ट्रम्प यांनी आभार मानले आहेत.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...