'जगातील नंबर एकच्या दहशतवाद्याचा खात्मा', डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं जाहीर

'जगातील नंबर एकच्या दहशतवाद्याचा खात्मा', डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं जाहीर

डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सकाळी एक ट्विट करत काहीतर मोठं झालं आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत आयसीस प्रमुख अबु बक्र अल बगदादीचा खात्मा झाल्याचं सांगितलं.

  • Share this:

वॉशिंगटन, 27 ऑक्टोबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादीचा खात्मा झाल्याचं जाहीर केलं. त्याची तीन मुलं आणि अनेक सहकारी मारले गेल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. बगदादी एका बोगद्यात लपून बसला होता. त्याला घेरल्यानंतर मुलांसह त्याने स्वत:ला उडवून घेतलं. तो भित्रा होता आणि कुत्र्यासारखा मेला असं ट्रम्प म्हणाले.

नाटो फौजांच्या हल्ल्यात बगदादीचा सीरियात खात्मा झाल्याचं म्हटलं जुलै महिन्यात म्हटलं जात होतं. पण ट्रम्प यांनी सांगितलं की, काल रात्री अमेरिकेनं जगातील नंबर एकचा दहशतवादी अबु बक्र अल बगदादीला ठार खेलं. तो जगातील सर्वात क्रूर आणि हिंसक संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख होता.

यापूर्वी 2018 मध्ये इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल बगदादीची ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्यात त्याने मुस्लिमांना जिहादचे आवाहन केलं होतं. तसेच पाश्चिमात्य देशांवर हल्ला करण्याबद्दलही त्यानं वक्तव्य केलं होतं. इराक आणि सीरियामधील इसिसच्या ताब्यातील भाग उद्ध्वस्त केल्यानंतर चिडलेल्या बगदादीने ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती.

2014 मध्ये सीरिया आणि इराकमधील मोठ्या भागावर इसिसनं ताबा मिळवला होता. त्या भागावर आपलं राज्य असल्याचं सांगत बगदादीनं स्वत:ला खलीफा घोषित केलं होतं. मात्र, आता या दोन्ही देशातून इसिसचा जवळपास नायनाट करण्यात आला आहे.

कोण होता बगदादी?

- संपूर्ण नाव - अबु बक्र अल बगदादी

- आयसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचा प्रमुख

- अल कायदाच्या इराक विभागाचा म्होरक्या होता

- 16 मे 2010 - अबु ओमर अल बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिसचा नेता

- 2 मे 2011 - ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर लादेनची स्तुती करणारं पत्र

- सीरियामधल्या यादवीनंतर 8 एप्रिल 2013 ला 'आयसिस'ची स्थापना

- 2014मध्ये सीरिया आणि इराकमध्ये खलिफ म्हणून घोषित केलं

VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या