लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला बसणार धक्का, दिल्लीत मोदींचाच झेंडा

लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला बसणार धक्का, दिल्लीत मोदींचाच झेंडा

मोदींची लोकप्रियता कमी होतेय का? असा प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर एक देशव्यापी सर्व्हे पुढे आलाय. त्यात आश्चर्यकारक निष्कर्ष आले असून काँग्रेससाठी वाईट बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 27 जानेवारी : CAAवरून सध्या देशात विरोध प्रदर्शने सुरू आहेत. वातावरण तापलंय. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णया विरोधात अनेक पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे मोदींची लोकप्रियता कमी होतेय का? असा प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर एक देशव्यापी सर्व्हे पुढे आलाय. त्यात आश्चर्यकारक निष्कर्ष आले असून काँग्रेससाठी वाईट बातमी आहे. तर दिल्लीत पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखालील NDAलाच सत्ता मिळेल असं स्पष्ट झालंय. तर महाराष्ट्रात भाजपला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

देशातल्या तापलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एबीपी आणि सी व्होटर यांनी हा सर्व्हे केलाय. यात देशातल्या 543 मतदार संघातल्या 30 हजारांपेक्षा जास्त मतदारसंघातल्या मतदारांशी बोलून हा सर्व्हे करण्यात आल्याचा दावा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असले तरी लोकसभा निवडणुका झाल्यास एनडीला स्पष्ट बहुमत मिळेल असं दिसतंय. मोदींना 330 जागा मिळण्याच्या शक्यता आहे. एनडीएला 2019मध्ये 353 जागा मिळाल्या होत्या.

VIDEO 'शिळ' घालून कलाकारांनी सादर केलं 'मिले सुर मेरा...' ऐकून व्हाल थक्क

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला फार फायदा होणार नाही. त्यांच्या अगदी कमी जागा वाढणार असून 130 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. 56 टक्के नागरिकांनी मोदींच्या कामगिरीवर खूष असल्याचं सांगितलंय. तर 20 टक्के नागरिकांनी असमाधानी असल्याचं सांगितलंय.

काँग्रेसने PM मोदींना Amazon वरून पाठवली 170 रुपयांची खास भेट, दिला खोचक सल्ला

महाराष्ट्रात मात्र भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपला 21 जागा तर महाविकास आघाडीला 27 जागा मिळतील असं सर्व्हेत म्हटलं आहे. 2019मध्ये भाजपला राज्यात 23 जागांवर विजय मिळाला होता.

First published: January 27, 2020, 10:21 AM IST

ताज्या बातम्या