Home /News /national /

चीनची फसवा फसवी? भारतात पाठवलेल्या 63 हजार PPE किटचा दर्जा निकृष्ट

चीनची फसवा फसवी? भारतात पाठवलेल्या 63 हजार PPE किटचा दर्जा निकृष्ट

Medical workers in protective suits entering a building under lockdown in downtown Kuala Lumpur, Malaysia, on Tuesday, April 7, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to the public to help curb the spread of the new coronavirus. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Vincent Thian)

Medical workers in protective suits entering a building under lockdown in downtown Kuala Lumpur, Malaysia, on Tuesday, April 7, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to the public to help curb the spread of the new coronavirus. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (AP Photo/Vincent Thian)

सरकारने दर्जाच्या संदर्भात जे नियम घालून दिले होते. त्या मानकांचं पालन होत नाही असं आढळून आलं आहे.

  नवी दिल्ली 16 एप्रिल: कोरोनावरून सर्व जगात चीनबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अनेकदा नाव घेऊन चीनवर उघडपणे टीका केली. चीनने कोरोनाची माहिती द्यायला उशीर केला. त्यामुळे जगभर हा आजार पसरला अशी ओरड होत आहे. तातडीची गरज असल्याने भारताने चीनमधून 63 हजार PPE किट Personal protective equipment(PPE) kits मागवल्या होत्या. त्या सर्व किटचा दर्जा निकृष्ट असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. यातल्या काही किट या भारताने विकत घेतल्या होत्या तर काही या देणगीच्या स्वरुपात मिळाल्या होत्या. सरकारने दर्जाच्या संदर्भात जे नियम घालून दिले होते. त्या मानकांचं पालन होत नाही असंही आरोग्य मंत्रालयांच्या सूत्रांनी सांगितलं. चीन अशाच प्रकरच्या किट जगभर निर्यात करत आहे. भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी, काही राज्यांमध्ये मात्र मृत्यू दर कमी झाला आहे. त्यामुळे भारताने कोरोनावर मात करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत प्रथमच 260 लोक कोरोना व्हायरसच्या संक्रमानातून बरे झाले आहे . एकाच दिवशी निरोगी होण्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला. आतापर्यंत भारतात 1,748 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 387 वर पोहचली आहे. मृतांचा आकडा हा 437 आहे.

  Good News:सप्टेबरपर्यंत येणार कोरोना लस, 100 देशाचे वैज्ञानिक गुंतले संशोधनात

  दरम्यान, गृह मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, परंतु त्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होईल. याआधी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चांगले निकाल दिसत आहेत.

   Air Forceच्या ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, पाक सीमेजवळ  थरार

  धारावी हे मुंबईतलं कोरोनाचं मोठं हॉटस्पॉट बनलं आहे. दररोज रुग्ण सापडण्याच्या संख्येत वाढ होत आहे. धारावीमध्ये आज कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळले. त्यामुळे धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुस्लिम नगरमध्ये  सर्वात 21 रुग्ण आहेत. तर त्यानंतर मुकुंद नगरमध्ये 18 रुग्ण आहे. धारावीतला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने मिशन धारावी ही मोहिम सुरू केली असून तिथल्या तब्बल साडेसात लाख लोकांचं स्क्रिनिंग करण्याची सरकारची योजना आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हे स्क्रिनिंग पूर्ण होणार आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गुरुवारी कोरोनाबाधित 286 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3202 झाली आहे. दिवसभरात 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 300 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या