10 वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्यास कोर्टाचा नकार

सुप्रीम कोर्टाने एका 26 आठवड्यांच्या कुमारी मातेची गर्भपात करण्यास याचिका फेटाळून लावली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2017 08:52 PM IST

10 वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्यास कोर्टाचा नकार

28 जुलै : सुप्रीम कोर्टाने एका 26 आठवड्यांच्या कुमारी मातेची  गर्भपात करण्यास याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या 10 वर्षांच्या कुमारी मातेला बाळाला जन्म द्यावा लागणार आहे.

न्यायाधीश जगदीश सिंह खेहर आणि न्यायमूर्ती धनंजय वाई प्रधान चंद्रचुड यांच्या पीठाने चंडीगड विधिक सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी या प्रकरणी न्यायलयाकडे दाद मागितली होती.

न्यायालयाने पीडित मुलीच्या 26 जुलैला वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले होते.

जर पीडितेला गर्भपात करण्यास परवानगी दिली तर तिच्या जीवाला काही धोका तर होणार नाही ना अशी विचारला कोर्टाने केली होती.  पण पीडित अल्पवयीन मुलगी 26 आठवड्यांची गर्भवती असल्यामुळे गर्भपात करता येणार नाही असं चंदीगढ कोर्टाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने चंदीगढ कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...