Home /News /national /

24 आठवड्यांनीही करता येणार गर्भपात, सुधारित कायद्याला कॅबिनेटची मंजुरी

24 आठवड्यांनीही करता येणार गर्भपात, सुधारित कायद्याला कॅबिनेटची मंजुरी

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, 1971मध्ये बदल करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित कायद्याचं विधेयक सादर केलं जाणार आहे.

    दिल्ली, 29 जानेवारी : भारतात आता 24 आठवड्यांनंतरही गर्भपात करता येणार आहे. गर्भपाताच्या मुदतवाढीला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट, 1971 (Medical Termination of Pregnancy Act, 1971) मध्ये बदल करण्यात येणार आहे. सुधारित गर्भपात कायद्यानुसार गर्भपाताची 20 आठवड्यांची मुदत 24 आठवडे केली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाणार आहे. सध्या भारतात कायद्यानुसार गर्भपात करण्याचा कालावधी 20 आठवडे आहे. 20 आठवड्यांपेक्षा जास्त गर्भ असेल तर गर्भपात करता येत नाही, गुन्हा नोंदवला जातो. गर्भपात करण्याचा कालावधी 20 आठवडे असल्यामुळे ग्रामीण भागात असुरक्षित गर्भपात करण्याचे प्रमाण वाढत आहे. गरोदरपणात नंतरच्या काळात काही गुंतागुंत निर्माण झाली, तर आईचा जीव वाचवण्यासाठी काही वेळा गर्भपात करण्याची वेळ येते. पण डॉक्टरांना हा निर्णय घेण्याअगोदर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार भारतात प्रत्येक वर्षी 17 लाख मुले व्यंगासह जन्माला येतात. जर गर्भपात कायद्यात बदल केला तर हे प्रमाण कमी होऊ शकतं असं अहवालात म्हटलं आहे.
    अन्य बातम्या स्त्रियांनी SEX नंतर चुकूनही करू नयेत 'या' 5 गोष्टी 8 लाख भारतीयांचे Extra-marital affair;  मुंबई, पुणे, नागपूरकरांचाही समावेश
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या