अभिनंदन वर्तमान यांच्या वैद्यकीय तपासणीतून झालं 'हे' उघड

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या काही वैद्यकिय तपासण्या पूर्ण

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 05:51 PM IST

अभिनंदन वर्तमान यांच्या वैद्यकीय तपासणीतून झालं 'हे' उघड

नवी दिल्ली, 03 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या काही वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिनंदन यांच्या एमआरआय स्कॅन रिपोर्टमध्ये डॉक्टरांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. पण त्यांच्या पाठीच्या कण्याला खालील बाजूस दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालात आढळले आहे.

मिग-21 विमान क्रॅश झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅराशूटच्या मदतीने खाली उडी घेतली, त्यावेळेस कदाचित त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापती झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, आरआर हॉस्पिटलमध्ये अभिनंदन यांच्या आणखी काही वैद्यकिय तपासण्या करण्यात येणार आहेत.Loading...कोण आहेत अभिनंदन वर्तमान?

भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांना पिटाळून लावत असताना भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग - 21 बुधवारी (27 फेब्रुवारी)क्रॅश झाले होते. यानंतर त्यांनी पॅरेशूटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. येथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. गुरुवारी (28 फेब्रुवारी)पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत केली. शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले होते. पण खरंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव वाढला होता.

पाकिस्ताननं 1 मार्चला अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केले. 1 मार्चला रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास अभिनंदन भारतात परतले. भारतात आल्यानंतर अभिनंदन यांच्या काही तपासण्या केल्या जाणार होत्या, त्याचाच एक भाग म्हणून काही वैद्यकीय तपासण्या केल्या गेल्या आहेत.

नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं जेट F-16 लढाऊ विमानं पाडताना भारताचं मिग-21 हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. यावेळी जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते.

पुन्हा विमान उडवण्यासाठी अभिनंदन यांना लागतील 3 महिने, कारण...

अभिनंदन यांना विमान उडवण्याकरता किमान 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. त्यासाठी काही नियम आहेत. हवाई दलाच्या नियमानुसार विंग कमांडर अभिनंदन यांचं मेडिकल चेकअप करण्यात येईल. सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये अभिनंदन पास झाले की त्यानंतर त्यांना विमान उडवण्यासाठी परवानगी दिली जाईल.

पण, वैद्यकीय चाचणीमध्ये कमी पडल्यास अभिनंदन यांची दुसऱ्या पदावर किंवा विमानावर बदली केली जाईल. भारतीय हवाई दलाच्या नियमांनुसार या साऱ्या गोष्टी पार पाडल्या जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...