News18 Lokmat

स्टॅम्प घोटाळा : अब्दुल करीम तेलगीसह 8 आरोपींची निर्दोष मुक्तता

कोट्यावधी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी अब्दुल करीम तेलगीसह 8 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 01:33 PM IST

स्टॅम्प घोटाळा : अब्दुल करीम तेलगीसह 8 आरोपींची निर्दोष मुक्तता

नाशिक, 31 डिसेंबर : कोट्यावधी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी अब्दुल करीम तेलगीसह 8 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 25 ऑगस्ट 2004ला आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. जिल्हा न्यायाधीश पी. आर देशमुख यांनी या प्रकरणी निकाल दिला आहे.

33 हजार कोटींचा मुद्रांक घोटाळा म्हणून चर्चेत असलेल्या या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. रेल्वेनं देशभरात मुद्रांक पाठवले असल्याचा आरोप होता. या खटल्यात रेल्वे सुरक्षा बल अधिकरी आणि कर्मचारी आरोपी होते.

खटल्यादरम्यान मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीचा मृत्यु झाला तर पुराव्याअभावी बाकी जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दरम्यान, 'तेलगी प्रकरणाचा नाहक मला त्रास झाला, त्याचा राजकीय फटका बसला आणि मला राजीनामा द्यावा लागला होता', अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. तेलगी प्रकरणात त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि आज तेलगीसह अनेकजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Loading...

काय आहे तेलगी प्रकरण?

तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी होता. त्याने त्याचा भाऊ अजिम तेलगीला सोबत घेऊन नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून बनावड स्टॅप छापण्याचा व्यवसाय सुरू केला होता.

तेलगीला नोव्हेंबर २००१ मध्ये राजस्थानच्या अजमेरमधून अटक करण्यात आली होती. तेलगीला अटक झाल्यानंतर त्याने अनेक राजकीय नेत्यांची नावं जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. २००७ मध्‍ये त्याला ३० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्‍यात आली होती.

तेलगीने बेळगाव, मुंबई आणि पुण्यात कोट्यवधीची बेहिशेबी मालमत्ता जमवली होती. शिक्षा सुनावल्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात हलवण्यात आलं होतं. पण पत्नी आणि मुलीच्या भेटीसाठी त्याने बंगळुरुमधील कारागृहात पाठावावं अशी विनंती केली होती. त्यानंतर त्याला बंगळुरूच्या परप्पन अग्रहार कारागृहात ठेवलं होतं.

बरेच दिवस तेलगीची प्रकृती ठिक नव्हती म्हणून त्याला बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अवयव निकामी झाल्यामुळे 26 ऑक्टोबर 2017ला त्याचा मृत्यू झाला होता.


VIDEO : डोंबिवलीत छेड काढणाऱ्याच्या बापालाच झोडपलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 01:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...