इंदौर (मध्य प्रदेश), 16 मे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आलं असताना शनिवारी (16 मे) ला एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवजात मुलीला अमानुष परिस्थितीत तिचे पालक सोडून गेले आहेत. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मुलीला वाचवलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राऊ परिसरातील रंगवासा औद्योगिक क्षेत्रात नवजात मुलगी रस्त्याच्या कडेला पोत्यात गुंडाळलेली आढळली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या चिमुरडीच्या अंगावर चक्क मुंग्या चढल्या होत्या. अनेक मुंग्या चावल्यामुळे बाळ खूप रडत होतं आणि म्हणून नागरिकांचं याकडे लक्ष गेलं.
कोरोनापासून बरे झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत करू नका SEX, धक्कादायक कारण समोर
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिसराती स्थानिक महिलांनी चिमुकलीला कचऱ्यातून बाहेर काढलं आणि तिच्या शरीरावरील मुंग्या काढून नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ केलं. पोलिसांनी मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. जिथे उपचारानंतर तिची प्रकृती सध्या ठीक आहे. मुलीच्या बाबतीत भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 317 नुसार अज्ञात आरोपींविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने गाठला 30 हजाराचा टप्पा, राज्यात एका दिवसात 67 मृत्यू
तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस सध्या आरोपी आई-वडिलांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नवजात मुलाची सुटका करणारी प्रादेशिक महिलांपैकी सविता म्हणाल्या की, "मी मुलीला वाईट अवस्थेत उचललं होतं. मी लॉकडाऊन तोडून बाहेर पडले म्हणून मला पोलिसांकडून ओरडण्यात आलं पण तरीही बाळाला वाचवलं"
पोलिसांच्या 'आशिर्वादा'ने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर खूनी खेळ, एकाची हत्या
संपादन - रेणुका धायबर