दानवेंच्या होम ग्राऊंडवरच भाजपला जोरदार धक्का, काँग्रेसने मारली बाजी

दानवेंच्या होम ग्राऊंडवरच भाजपला जोरदार धक्का, काँग्रेसने मारली बाजी

या नगरपरिषदेतील 26 पैकी 24 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर अवघ्या दोन जागांवर भाजपला यश मिळू शकलं.

  • Share this:

औरंगाबाद, 28 फेब्रुवारी : औरंगाबादमधील सिल्लोड नगरपरिषदेवर काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं आहे. या नगरपरिषदेतील 26 पैकी 24 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर अवघ्या दोन जागांवर भाजपला यश मिळू शकलं.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या जालना या लोकसभा मतदारसंघात सिल्लोडचा समावेश होतो. असं असताना दानवेंना या ठिकाणी प्रभाव पाडता आला नाही. अब्दुल सत्तार यांनी दानवेंना पुन्हा एकदा शह दिला आहे. दुसरीकडे, एमआयएम आणि शिवसेनेला या ठिकाणी खातं सुद्धा उघडता आलं नाही.

सिल्लोडमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार हे आमदार आहेत. गेली 25 वर्ष ही नगरपरिषद अब्दुल सत्तार यांच्याच ताब्यात आहे. यावेळीच्या निवडणुकीतही सत्तार यांचाच करिष्मा पाहायला मिळाला. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री निकम यांचा तब्बल 11 हजार मतांनी विजय झाला आहे. भाजपला मात्र या निवडणुकीत मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला.

तुम्ही कितीही कणखर असाल, पण हा VIDEO पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील

First published: February 28, 2019, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading