डिब्रूगड, 03 फेब्रुवारी: नदीला आग लागेली तुम्ही कधी पाहिली आहे का? पण हो नदीमध्ये आग आणि परिसरात धुराचे मोठे लोट दिसत आहेत. हा व्हिडिओ खोटा नाही तर आसाममधील डिब्रूगड इथला खरा व्हिडिओ आहे. इथे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. पाणी असूनही आग विझत नाही तर अति रौद्र रुप धारण करत असल्याचं दिसत आहे. तेलाची पाईपलाईन फुटल्यानं ही भीषण आग लागल्याचं सांगितलं जात आहे.
पाईपलाईन फुटून आग लागल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उसळत आहेत. ही आग सुमारे तीन दिवसांपासून सुरू असल्याचं स्थानिकांचा दावा आहे. या नदीवरून ऑइल इंडिया लिमिटेडची पाईप लाइन असल्याचं सांगितलं जात आहे. ही पाईपलाईन फुटल्यानं पाण्यात तेल मिसळलं आणि मोठ्या प्रमाणात आग भडकली. या आगीवर अद्यापही पूर्णपणे नियंत्रण मिळू शकलं नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
पाण्यावर आग भडकत असल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडिओबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र हा व्हिडिओ आसाम इथल्या डिब्रूगड परिसरातील आहे. तीन दिवसांपासून ही आग सुरू आहे. हैराण होण्यासारखी ही बाब आहे की तीन दिवसांपासून या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अजून यश आलं नाही. आगीमुळे नदी काठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आले आहेत.
हेही वाचा-परीक्षेत अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून करत होता कॉपी, असा गेला बाराच्या भावात
हेही वाचा-शरजील इमामच्या समर्थनासाठी मुंबईत घोषणाबाजी, फडणवीसांनी शेअर केला VIDEO