अारुषी हत्या प्रकरण: राजेश आणि नुपूर तलवार दोषमुक्त-हायकोर्ट

अारुषी हत्या प्रकरण: राजेश आणि नुपूर तलवार दोषमुक्त-हायकोर्ट

कोर्टानं आपला निर्णय ऐकवताना म्हटलं की, तलवार दाम्पत्यानं आपल्या मुलीचा खून केला नाही. राजेश आणि नुपूर तलवार यांना संशयाचा फायदा मिळाला.

  • Share this:

12 आॅक्टोबर : आरुषी-हेमराज खून खटल्याचा निकाल हायकोर्टानं सुनावलाय. हायकोर्टानं राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना निर्दोष ठरवलंय. सीबीआय कोर्टाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. त्याविरोधात तलवार दाम्पत्य अलहाबाद हायकोर्टात गेलं होतं.

कोर्टानं आपला निर्णय ऐकवताना म्हटलं की, तलवार दाम्पत्यानं आपल्या मुलीचा खून केला नाही. राजेश आणि नुपूर तलवार यांना संशयाचा फायदा मिळाला.

आरुषी आणि हेमराजची हत्या 15 मे 2008ला रात्री नोएडात सेक्टर 25 जलवायू विहार इथल्या घरी झाली होती. या खुनामध्ये आरुषीच्या आई-वडिलांनाच दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोघंही डाॅक्टर आहेत.

काय आहे आरुषी-हेमराज हत्या प्रकरण?

आरुषी तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले असले तरी, अजूनही या संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे.

कसा घडला घटनाक्रम?

- 2008 मध्ये आरुषी हत्याकांड

- 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह सापडला

- 16 मे 2008मध्ये नोएडातील जलवायू विहार परिसरातील घटना

- दुसऱ्या दिवशी तलवार कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला

- दुहेरी हत्येप्रकरणी आरुषीच्या आई-वडिलांना अटक

- तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी सीबीआयकडे प्रकरण सोपवलं

- सीबीआयनं तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला

- 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा

- शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांची हायकोर्टात धाव

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 03:31 PM IST

ताज्या बातम्या