पचास साल का बच्चा बिल्कुल नहीं है सच्चा, भाजपच्या प्रवक्त्याची राहुल गांधींवर टीका

पचास साल का बच्चा बिल्कुल नहीं है सच्चा, भाजपच्या प्रवक्त्याची राहुल गांधींवर टीका

'सुप्रीम कोर्टाच्या खांद्यावर बंदुक ठेवून कुणी निशाणा साधू नये असं सुप्रीम कोर्टाने आज म्हटलं आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 15 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. नेत्यांची वक्तव्यांनी वातावरण तापलं आहे. अनेक पक्षांच्या वाचाळवीरांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज वातावरण तापलं आहे. बसपाच्या नेत्या मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचारासाठी काही दिवसांसाठी प्रचारासाठी बंदी घातली. तर आझम खान यांच्यावर देशभरातून तीव्र टीका झाली. हे होत असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिलीय.

सुप्रीम कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर ठरवलं असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. याच मुद्यावर आधारीत होता आजचा 'आर पार' हा कार्यक्रम. या कार्यक्रमात बोलताना भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, पचास साल का बच्चा बिल्कुल नहीं है सच्चा. राहुल गांधी हे खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टाच्या खांद्यावर बंदुक ठेवून कुणी निशाणा साधू नये असं सुप्रीम कोर्टाने आज म्हटलं आहे. गौरव भाटीया म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान मी तिथे उपस्थित होतो. कोर्टाचा निकाल माझ्याकडे आहे. त्यात कोर्टाने अतिशय कडक ताशेरे ओढले आहे. राहुल गांधी हे सातत्याने खोटे बोलत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

तर काँग्रेसचे प्रवक्ते अभय दुबे यांनी भाजप खोटं बोलत असल्याचा आरोप केला. सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली त्यात कोर्टाने सरकारच्या भूमिकेविषयी गंभीर ताशेरे ओढले असे ते म्हणाले. चौकीदार चौर है असं त्यांनी म्हणताच गौरव भाटीया यांनी राहुल गांधी यांचं पूर्ण घराणेच चौर असल्याचं म्हटलं.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजकुमार भाटी यांनी राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचं नाव घेत जे वक्तव्य केलं ते योग्य नसल्याचं म्हटलं त्यांच्यावर आयोगाने कारवाई करावी असंही ते म्हणाले. मात्र राफेल प्रकरणावरून जे आरोप होत आहेत त्यात तथ्य आहेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

First published: April 15, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading